Tuesday, 30 May 2023

प्राचीन भारतातील १२ साम्राज्य भाग २

 



प्राचीन भारतातील १२ साम्राज्य
भाग २
२. चंद्रगुप्त मौर्य (३२१ बीसी - २९८ बीसी): इतिहासकार असं मानतात की चंद्रगुप्त मौर्य हा खर्या अर्थाने भारताचा पहिला सम्राट होता. धनानंदाचा पराभव करत, नंद साम्राज्य संपवत हा राजा झाला. आर्य चाणाक्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने त्याचे साम्राज्य वाढवले. उत्तरेकडे इराणची सीमा, पूर्वेकडे बंगालपर्यंत आणि दक्षिणेत दख्खनच्या पठारापर्यंत त्याचे राज्य पसरले होते. याचे सैन्यदल प्रचंड मोठे होते. त्याचे गुप्तहेर खातं एकदम प्रभावी होतं. केंद्र आणि राज्य सरकार अशी त्याच्या राज्याची पद्धत होती. ग्रीक साहित्याप्रमाणे अलेक्झांडर आणि चंद्रगुप्त याची भेट झाली होती.
३. सम्राट अशोक (२७३ बीसी - २३९ बीसी): हा चंद्रगुप्ताचा नातू आणि बिंदुसाराचा मुलगा. बुद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी याने अतिशय रक्तरंजित लढाया करत आपले साम्राज्य मजबूत केले.कलिंग देशाबरोबरच्या युद्धात भरपूर जीवितहानी झाली आणि यानंतर त्याने बुद्ध धर्माचा स्वीकार आणि प्रचार केला. अनेक लोकोपयोगी कामे त्याने या काळात केली. बुद्ध धर्म भारताच्या सीमेबाहेर नेण्याचे श्रेय याला जाते.

No comments:

Post a Comment

हिराबाई पेडणेकर:

  हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली "पुरुषानेही स्त्रीवर...