Showing posts with label जनपद व महाजनपदे. Show all posts
Showing posts with label जनपद व महाजनपदे. Show all posts

Monday, 18 April 2022

जनपद व महाजनपदे भाग 4

 जनपद व महाजनपदे 

भाग 4

पोस्तसंभार : DR Sitaram Ingole 



'जनपद' व 'महाजनपद' असा उल्लेख तत्कालीन साहित्यात येतो. अनेक गावे व शहरे मिळून जनपद तयार होई. 

अनेक लहान लहान जनपदे मोठ्या जनपदांत विलीन होत असत. 

मोठ्या 'जनपदाला'च 'महाजनपद' असे म्हणत असत, जैन भगवती सूत्रात १६ महाजनपदांची नावे आहेत तर 'महागोविंद सूत्र' या ग्रंथात ७ महाजनपदांच्या राजधानीचे संदर्भ आहेत. 

'अंगुत्तरनिकाय' या बौद्ध ग्रंथात १६ महाजनपदांची माहिती आहे. या १६ महाजनपदांच्या भौगोलिक सीमा, राजांची नावे इ. त्यांच्यातील सत्तास्पर्धा व संबंध आदींबाबतचा इतिहास जुळवण्याचे काम इतिहासकारांनी केलेले आहे. 

१६ महाजनपदांचा अभ्यास खालीलप्रमाणे करता येईल. 


११) पांचाल : 


आजच्या रोहिलखंडात हे महाजनपद होते. त्याचे उत्तर पांचाल व दक्षिण पांचाल असे दोन भाग होते व त्याच्या अनुक्रमे 'अहिछत्रा' व 'काम्पिल्या' या दोन राजधाल्या होत्या, उत्तर व दक्षिण पांचाल यांच्यातही सत्तेसाठी संघर्ष होता. 

उत्तर पांचाल व कुरू यांच्यातही वर्चस्वाचा लढा चालू होता. महाभारतातील अर्जुनाची पत्नी द्रौपदीचा "पांचाली' असा उल्लेख आहे. बौद्ध कालखंडात मात्र पांचाल हे प्रभावशून्य राज्य बनले होते.


१२) अश्मक:


अवंतीच्या दक्षिणेला व गोदावरी नदीच्या खोऱ्यात नांदेड व आंध्र प्रदेशातील निझामाबाद जिल्हा या प्रदेशात हे जनपद होते. 

 अश्मकांचा उल्लेख पाणिनीने केला. त्यांची राजधानी 'पोतन' महणजे निझामाबाद जिल्ह्यातील बोधन होय असे मत डॉ. बी. सी. लॉ यांनी व्यक्त केले आहे. 

महाभारतातील उल्लेखानुस्सर राजर्षी अश्मकने पोतनानगरीची स्थापना केली. 

महाभारतात तसेच बौद्ध व जैन वाङ्मयात अश्मकांचा 'अस्सक' असा उल्लेख आहे.


१३) गांधार:


आधुनिक काश्मीर व तक्षशिलेच्या परिसरात गांधाराचे राज्य होते. गांधारची राजधानी तक्षशिला होती. 

तक्षशिला हे व्यापारी केंद्र व विद्येचे केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. प्रारंभीच्या काळात तक्षशिला हे वैदिक विद्येचे केंद्र होते तर कालांतराने बौद्ध विद्येचे केंद्र असा तक्षशिलेचा लौकिक होता. 

डॉ. रायचौधरी यांच्या मते, गांधारचे राजे धार्मिकदृष्टया उदारमतवादी होते. कारण जैन साहित्यात गांधारचे राजे जैन धर्माचे अनुयायी आहेत असे म्हटले होते. 

ब्राह्मण साहित्यात ते ब्राह्मण धर्माचे अनुयायी आहेत असा त्यांचा उल्लेख आहे. तक्षशिला येथील उत्खननात बौद्ध अवशेष सापडले आहेत. 

इ. स. पू. ६ व्या शतकात पुष्कर सारिन हा राजा तेथे राज्य करीत होता. त्याने मगधचा राजा बिंबीसार याच्या दरबारी आपला वकील पाठवला होता.


१४) शूरसेन :


 मत्स्यालगतच शूरसेन सेनी याचे राज्य होते. मथुरा हि राज्याची राजधानी होती. 

वैदिक साहित्यात शूरसेन किंवा मथुरेचा उल्लेख सापडत नाही, परंतु महाभारत व पुराणग्रंथात मात्र या महाजनपदांचे उल्लेख सापडतात.


१५) कंबोज:

 आधुनिक पाकिस्तान व गुजरातचा काही प्रदेश यात कंबोजचे राज्य होते. द्वारका ही कंबोजची राजधानी होती. 

वैदिक काळात कंबोज हे वैदिक शिक्षणाचे केंद्र होते. कंबोज हे व्यापारी व सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. 

ह्युएनत्संगच्या प्रवासवर्णनात कंबोजचा उल्लेख आला आहे.

 महाजनपदाच्या सत्तासंघर्षात कंबोज फारसे सक्रिय नव्हते. इतर राज्यांप्रमाणे हे राज्यही मगधच्या अधिपत्याखाली गेले असावे.


१६) मगध : 

आधुनिक बिहारमधील पाटणा व गया परिसरात हे गणराज्य उदयास आले. 

वैदिक आर्याच्या काळात मगध प्रदेश वैदिक संस्कृतीच्या बाहेर होता. 

सोळा महाजनपदांत श्रेष्ठत्वाचा जो लढा झाला त्यात मगध विजयी झाले. मगधचे श्रेष्ठत्व व सार्वभौमत्व सर्व छोट्या-मोठ्या संतांनी मान्य केले होते. 

भारताच्या राजकीय इतिहासातील पहिले प्रबळ साम्राज्य म्हणून मगध पुढे आले. 

पुराणग्रंथ, जैन व बौद्ध ग्रंथातून मगध महाजनपदांचा इतिहास व मगधवर राज्य केलेल्या राजवंशांच्या वंशावळी दिल्या आहेत.

 जैन ग्रंथात मगधला पवित्र जनपद मानले आहे. मगधामध्ये जैन ज्ञान व जैनाचार यांचे रक्षण चांगल्या प्रकारे होऊ शकेल, असे महावीर वर्धमानने म्हटले होते. 

मगधवर नंद वंशाचे राज्य येण्यापर्वी ८ राजवंश सत्तेवर आले होते असे पुराणात म्हटले आहे. 

त्यापैकी इतिहासाला ज्ञात वंश खालीलप्रमाणे आहेत.

१) ब्रहद्रथ वंश

२) हर्षक वंश

३) शिशुनाग वंश (इ. स. पू. ५४३ ते ४२३

४) नंद वंश ( इ. स. पू. ४२३ ते ३२३

५) मौर्य वंश (इ. स. पू. ३२३ ते इ. स. पू. १८७).).).श.श.

जनपद व महाजनपदे भाग 3

 

जनपद व महाजनपदे

भाग 3

पोस्तसांभार ::Dr Sitaram Ingole


'जनपद' व 'महाजनपद' असा उल्लेख तत्कालीन साहित्यात येतो. अनेक गावे व शहरे मिळून जनपद तयार होई. 

अनेक लहान लहान जनपदे मोठ्या जनपदांत विलीन होत असत. 

मोठ्या 'जनपदाला'च 'महाजनपद' असे म्हणत असत, जैन भगवती सूत्रात १६ महाजनपदांची नावे आहेत तर 'महागोविंद सूत्र' या ग्रंथात ७ महाजनपदांच्या राजधानीचे संदर्भ आहेत. 

'अंगुत्तरनिकाय' या बौद्ध ग्रंथात १६ महाजनपदांची माहिती आहे. या १६ महाजनपदांच्या भौगोलिक सीमा, राजांची नावे इ. त्यांच्यातील सत्तास्पर्धा व संबंध आदींबाबतचा इतिहास जुळवण्याचे काम इतिहासकारांनी केलेले आहे. 

१६ महाजनपदांचा अभ्यास खालीलप्रमाणे करता येईल. 


५) चेदी : 

आजच्या बुंदेलखंड परिसरात चेदीचे राज्य होते. यमुना नदीच्या नजीक कुरू व वत्स या दोन महाजनपदांमध्ये चेदीचे राज्य होते.

 जातककथांत 'सोभवती' ही चेदीची राजधानी होती, असे म्हटले आहे. चेदीचे दोन भाग असावेत. एक भाग सावेत व दुसरा नेपाळच्या डोंगरदऱ्यांमध्ये असावा. 

महाभारतात 'शुक्तिमत' ही चेंदीची राजधानी होती अशी नोंद आहे. चेंदी हे फारसे प्रभावी महाजनपद नसल्यामुळे ते मगधने जिंकून घेतले.

६) वत्स : 

महाभारत कालखंडापासून 'वत्स' हे गणराज्य अस्तित्वात असल्याचे दिसते. वत्स या राज्याची राजधानी कोसंबी होती.

 आजच्या अलाहाबाद व बांदा जिल्ह्याचा प्रदेश महाजनपदाच्या अधिपत्याखाली होता. आजच्या अलाहाबादजवळील कोशलनगर म्हणजेच त्या काळातील कोसंबी होय. 

वत्स या राज्याचा राजा उदयन हा गौतम बुद्धाचा समकालीन होता. तो अतिशय पराक्रमी, महत्त्वाकांक्षी व साम्राज्यवादी होता.

 उदयनविषयीच्या अनेक आख्यायिका बौद्ध साहित्यात आल्या आहेत. तत्कालीन नाटकातून उदयन व वासवदत्ता यांच्या प्रेमकथा आल्या आहेत. 

राजा उदयनचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने अनेक राजकन्यांशी विवाह करून अनेक महाजनपदांशी आपली नाती जोडली व स्वतःचे गणराज्य मजबूत केले. 

डॉ. के. पी. जयस्वालांच्या मते, “अशा वैवाहिक संबंधातूनच उदयनने आपले साम्राज्य टिकवले होते." 

उदयनने राज्याच्या अनेक भागांत किल्ले बांधले होते. प्रारंभी त्याने बौद्ध धर्माला विरोध केला असला तरी नंतर मात्र बौद्ध धर्माचा स्वीकार करून राजाश्रयही दिला होता. 

कोसंबी हे बौद्ध धर्माचे केंद्र बनले होते. कोसंबी हे शहर तलम कापड निर्मिती व ते विक्रीचे मोठे केंद्र होते. उदयनव्यतिरिक्त या गणराज्याची फारशी माहिती उपलब्ध नाही. 

७) मत्स :(मात्स्य) 

मध्ययुगीन जयपूर म्हणजेच प्राचीन काळातील मत्स हे गणराज्य होय. हे गणराज्य कुरूंच्या दक्षिणेला होते. 

मत्सची राजधानी विराटनगर (सध्याचे वैराट) असावी. मत्स हे महाभारतकालीन विराटचे राज्य होते. या राज्याचा विस्तार चंबळच्या डोंगरदन्यांपासून ते सरस्वती नदीच्या जंगली प्रदेशापर्यंत झाला असावा: प्रारंभी हे गणराज्य वेदी राज्याचे अंग असावे.

 महाजनसतांच्या सत्तासंघर्षपासून हे गणराज्य दूर राहिल्याने त्याचा प्रभाव राजकारणावर पडला नाही. मगधमध्ये हे गणराज्य विलीन झाले असावे.


८) अवंती : 

अवंती हे पश्चिम भारतातील एक महत्वाचे गणराज्य होते.

 गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेशाचा काही भाग अवंतीच्या सीमारेषेत येत असावा. 

या गणराज्यातील पर्वतांमुळे अवंतीचे दोन भागात विभाजन झाले होते. उत्तरेची राजधानी उज्जैन तर दक्षिणेची माहिस्मती होती.

गौतम बुद्धाच्या काळात अवंती हे प्रसिद्ध शहर होते. सुपीक प्रदेश व्यापारी मार्गावरील मोक्याचे स्थान, कर्तबगार राजे आदीमुळे अवंतीचे राज्य प्रबळ बनले होते. 

गौतम बुद्धाच्या काळात चंडप्रद्योत हा अत्यंत शक्तिशाली सम्राट अवंतीत होऊन गेला. 

त्याने आपली एक कन्या वत्स महाजनपदाचा राजा उदयन याला दिली तर दुसरी कन्या मथुरेचा शूरसेन यास दिली. या वैवाहिक संबंधांमुळे खंडप्रद्योतचे व अवंतीचे महत्त्वही वाढले. 

त्याने बौद्ध धर्म स्वीकारला व बौद्ध धर्मप्रसारास उत्तेजनही दिले होते. अवंतीचा प्रदेश हा बौद्ध धर्माचे आश्रयस्थान बनला होता.

 चंडप्रद्योतनंतरचे राजे कमकुवत निघाल्याने ते राज्य लयास गेले व मगध साम्राज्यात विलीन झाले. चंडप्रद्योतनंतरचा अवंतीचा इतिहासही उपलब्ध नाही.


९) मल्ल:

 महाभारतात पूर्व भारतातील अंग, वंग, कलिंग यांच्याबरोबर मल्लांचा उल्लेख आढळतो. हे द्विकेंद्री गणराज्य होते. कुशीनगर व पावा ही या गणराज्यातील दोन राजधानीची केंद्रे होती. 

कुशीनगर म्हणजे गोरखपूरजवळचे कसिया व पावा म्हणजे कसियाजवळचे 'पद्रोना' होय. ही दोन्ही स्थळे बौद्ध धर्मीयांची पवित्र स्थळे होत.

 गौतम बुद्धाने आपले अंतिम भोजन पावा येथे घेतले. तेथेच ते कुशी (कुशीनगर) येथे मृत्यू पावले.

 मल्ल व लिच्छवी यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते व अधूनमधून संघर्षही होई. पुढे मगध साम्राज्यापुढे मल्लचा निभाव लागला नाही व ते गणराज्य मगधमध्ये विलीन झाले.


१०) कुरू:

 कुरू हे महाजनपद सर्वात प्राचीन व विस्ताराने ११२ योजनेएवढे मोठे होते. 

आजच्या दिल्ली व मिरत या यमुनेच्या सुपीक पट्ट्यात कुरूंचे राज्य होते व हस्तिनापूर ही त्याची राजधानी होती.

 महाभारत हा कुरूंचा इतिहास आहे. महाभारत काळात कुरूंना जे महत्त्व व प्रतिष्ठा होती ती बुद्धकाळात नव्हती. 

बुद्ध जातककथांतून कुरुंच्या काही राजा व राजकुमारांचे उल्लेख आले असले तरी ते राज्य कमकुवत झाले असावे व शेवटी मगधने ते जिंकून घेतले.

जनपद व महाजनपदे भाग 2

 

जनपद व महाजनपदे 

भाग  2

पोस्तसांभार : Dr Sitaram Ingole 



'जनपद' व 'महाजनपद' असा उल्लेख तत्कालीन साहित्यात येतो. अनेक गावे व शहरे मिळून जनपद तयार होई. 

अनेक लहान लहान जनपदे मोठ्या जनपदांत विलीन होत असत. 

मोठ्या 'जनपदाला'च 'महाजनपद' असे म्हणत असत, जैन भगवती सूत्रात १६ महाजनपदांची नावे आहेत तर 'महागोविंद सूत्र' या ग्रंथात ७ महाजनपदांच्या राजधानीचे संदर्भ आहेत. 

'अंगुत्तरनिकाय' या बौद्ध ग्रंथात १६ महाजनपदांची माहिती आहे. या १६ महाजनपदांच्या भौगोलिक सीमा, राजांची नावे इ. त्यांच्यातील सत्तास्पर्धा व संबंध आदींबाबतचा इतिहास जुळवण्याचे काम इतिहासकारांनी केलेले आहे. 

१६ महाजनपदांचा अभ्यास खालीलप्रमाणे करता येईल. 


१) अंग:

 हे महाजनपद बिहारमधील मोंधीर व भागलपूरच्या परिसरात होते. महाभारतात अंगचे उल्लेख आहेत. 

चंपा या नदीच्या काठी हे महाजनपद वसलेले होते व मगध हे त्याच्या शेजारचे राज्य होते. 

चंपा ही अंगची राजधानी होती. चंपा हे अत्यंत वैभवसंपत्र शहर व व्यापारी केंद्र होते. गंगा व चंपा या दोन नद्यांच्या संगमावर हे शहर वसलेले होते. 

'दीघनिकाय' या ग्रंथातील नोंदीनुसार तत्कालीन भारतातील प्रमुख ६ शहरांमध्ये चंपा एक होते. चंपा शहराचा सुवर्णभूमीशी व्यापारी संबंध होता.

 इ. स. पू. ६ व्या शतकात 'अंग' हे गणराज्य मगध राज्यात विलीन झाले. मगधाचा राजा बिंबीसार याने ब्रह्मदत्ताची हत्या करून अंग गणराज्य ताब्यात घेतले.


२) काशी: 

काशी है प्रमुख महाजनपद होते व वाराणसी ही त्याची राजधानी होती. 

वरुणा व अशी या दोन नद्यांच्या मध्ये वसलेले शहर म्हणून वाराणसी हे नाव पडले. 

काशीचे धार्मिक महत्त्व आरंभापासून आजपर्यंत अबाधित आहेत.

 गौतम बुद्धाने काशी परिसरातील सारनाथ येथे आपले पहिले धर्म प्रवचन दिले होते. 

गंगा- यमुनेच्या परिसरातील काशी हे महामार्गाचे केंद्र होते. बौद्ध जातककथा व पुराणातून काशीसंबंधीच्या कथा आल्या आहेत.

काशी जातककथांनी 'काशी' या जनपदाचे व वाराणसी शहराचे खूप विस्ताराने वर्णन केले आहे. काशी हे ३०० योजने विस्तारलेले होते. 

काशी या जनपदाचा कोसल, अंग व मगध या तीन महाजनपदांशी सतत संघर्ष सुरू होता. 

जैन तीर्थकार पार्श्वनाथाचे वडील अश्वसेन हे काशीचे राजा होते असा उल्लेख जातककथात आला आहे. 

काशीने कोसलवर आक्रमण करून कोसल जिंकले असले तरी कालांतराने काशीचे राज्य प्रभावशून्य झाले व शेवटी कोसल या महाजनपदानेच काशीचे राज्य आपल्या राज्यात सामावून घेतले.


(३) कोशल (लखनौ व फैजाबाद जिल्हे) :

अयोध्येच्या आवतीभोवतीच्या प्रदेशाचा कोशल राज्यात समावेश होता. श्रावस्ती ही त्याची राजधानी असून कोशलवर इक्ष्वाकू वंशाची आधिसत्ता होती. 

शेजारच्या शाक्य, कोलिया वगैरे गणराज्यावर कोशलचे वर्चस्व होते. अयोध्या श्रावस्ती व साकेत ही प्रसिद्ध नगरे या राज्यात होती. 

खिस्तपूर्व सातव्या शतकात कोशलपेक्षा बलाढ्य असलेले काशीचे राज्य विस्तारवादी कोशल नरेशाने काबीज केले. 

प्रसेनजित उर्फ पसेनादी हा पराक्रमी पुरुष कोशलचा राजा होता, तक्षशिला विद्यापीठात त्याचे शिक्षण झाले. तो उत्तम राजकारणपटू व श्रेष्ठ प्रतीचा सेनापती होता. 

प्रसेनजिताने आपली बहीण कोशलादेवी मगध सम्राट बिंबिसार यास दिली. तिला लग्नातील सप्रेम भेट म्हणून काशीनगरीचे उत्पन्न दिले. यामुळे कोशल व मगध ह्या बलाढ्य राज्यात सख्य स्थापन झाले. 

पुढे बिंबिसार व कोशलादेवीच्या मृत्युनंतर प्रसेनजिताने काशीचे उत्पन्न मगध सम्राटास देणे बंद केले. त्यामुळे बिंबिसारचा पुत्र मगध सम्राट अजातशत्रू व प्रसेनजित यांच्यातील वैमनस्य वाढले दोघांत अनेकदा यद्ध झाले. 

अखेर तह व सख्य होऊन प्रसेनजिताने अजातशत्रुला काशीनगरी व आपली कन्या वजिरा दिली.

प्रसेनजिताला गौतमबुद्धाबद्दल आदर असल्यामुळे गौवनाच्या शाक्य कुलाशी नातेसंबंध व्हावा या हेतूने त्याने शाक्य राजकन्येशी विवाह ठरविला.

पण उद्घट शाक्य लोकांनी राजकन्या म्हणून दासकन्येशीच प्रसेनजिताचा विवाह लावून दिला. पित्याच्या या फसवणुकांचा प्रसनजितपुत्र विदूदभ याने बदला घेतला. 

विदूदभ आपल्या क्रूर कृत्याबद्दल कुप्रसिद्ध होता त्यान शाक्य गणराज्यावर हल्ला चढविला व खूप कत्तल करून चांगलाच सूड उगविला.

 विदूदभने आपला पिता प्रसेनजित याला मंत्र्याच्या मदतीने पदच्यूत करून कोशलची गादी बळकावली. 

तेव्हा निराश्रित प्रसेनजित स्वरक्षणासाठी आपला भाचा व जावई मगध सम्राट अजातशत्रूची मदत मिळविण्यासाठी राजगृहाला निघाला. पण राजगृहाला पेहचताच मृत्यू पावला. 

प्रसेनजित बौद्ध धर्माचा मोठा आश्रयदाता होता. प्रसेनजित व बुद्धभेट प्रसिद्ध आहे. ब्राह्मणांनाही त्याने उदार देणग्या दिल्या.

 कोशलचा पुढील इतिहास अज्ञात असला तरी कोशलचे राज्य पुढे मग साम्राज्यात सामील करण्यात आले हे स्पष्ट होते.


४) वृज्जी महाजनपद : 

वृज्जीचा उल्लेख अत्तहकुळांक (आठ कुळांचे) जनपद असा केला जातो. ही आठ कुळे म्हणजे वृज्जी, विदेह, लिच्छवी, ज्ञातृक, उग्र, भोग,ऐनाव, वगरचे गणराज्य होय. 

हे गणराज्य आजच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात पसरलेले असावे. वैशाली हे शहर या संपूर्ण महाजनपदाची राजधानी होती.

 वैशालीनगरीचे संदर्भ रामायणात, बौद्ध व जैन वाङ्मयात आढळतात. 

'वृज्जी' या राज्यसंघाचे लिच्छवी मल्ल, काशी व कोसल या महाजनपदाशी मैत्रीचे संबंध होते. 

वृज्जी महाजनपदातील लिच्छवीची राजधानी वैशाली तर विदेहची राजधानी मिथिला होती. 

वैशाली हे अतिशय वैभवसंपन्न समृद्ध तटबंदी असणारे शहर होते. धर्मप्रसारासाठी गौतमाने वैशालीला अनेक वेळी भेट दिली.

 आजच्या बिहारमध्ये मुज्जफरपूर जिल्ह्यातील बसरा गाव म्हणजे प्राचीन वैशाली होय. 

वैशाली येथेच बौद्ध धर्माची दुसरी परिषद भरली होती.

 लिच्छवीची राजकन्या चेल्लना हिचा विवाह मगधचा राजा बिंबिसारशी झाला होता. परंतु वृज्जी हा राज्यसंघ फार काळ टिकला नाही. 

मगध राजा अजातशत्रूने वृज्जी राज्यसंघाला आपल्या साम्राज्यात सामावून घेतले.



जनपद व महाजनपदे भाग १

 जनपद व महाजनपदे 

भाग १

पोस्तसांभार :Dr Sitaram Ingole



 मीर्यपूर्वकालात इ. स. पू ६ व्या शतकात अनेक धर्मपथांचा व धर्माचा उदय होऊन शेवटी बौद्ध धर्मासारखा महान धर्म उदयास आला. त्याचप्रमाणे या काळात अनेक राज्याचा उदय होऊन शेवटी मगधाचे महान राज्य म्हणजेच मगध साम्राज्य उदयास आले.

 इसवीसनपूर्व ६ व्या शतकात भारतात अनेक लहानलहान राज्ये होती. त्यापैकी सोळा राज्य प्रमुख असून त्यांना 'सोळा महाजनपदे' असे म्हणत.

सोळा महाजनपदे:

 (१) काशी (बनारस). (२) कोशल (अयोध्या). (३) अंग (पूर्व बिहार-भागलपूर जिल्हा). (४) मगध (दक्षिण बिहार, पाटणा व गया जिल्हे). (५) वृज्जि संघराज (उत्तर बिहार). (६) मल्ल (गोरखपूर जिल्हा). (७) चेदी (आजचा बुंदेलखंड), (८) वत्स (अलाहाबाद प्रदेश). (९) कुरू (अलिगढ, मिरत, दिल्ली , स्थानेश्वर हे जिल्हे). (१०) पांचाल (रोहिलखंड) (११) मात्स्य (जयपूर), (१२) शूरसेन (मथुरा), (१३) अश्मक (गोदावरी जवळ). (१४) अवन्ती (मध्य माळवा). (१५) वायव्य गांधार (पेशावर व रावळपिंडी हे जिल्हे) आणि (१६) कंबोज (भारत) 

सर्व राज्यांतील शासनप्रणाली सारखी नव्हती. लोकसत्ताक, एकसत्ताक, राजसत्ताक महाजनसत्ताक अल्पजनसत्ताक ई. प्रकारच्या शासनप्रणाली निरनिराळ्या राज्यात प्रचलित होत्या.

 काही राज्यांतील कार्यकारी शाखेचा मुख्य प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडलेला असे. अशा राज्याला "गणराज्य" म्हणतात.

 गणराज्याच्या अस्तित्वावरून भारतीयाना गणराज्याची कल्पना होती है स्पष्ट आहे. वृज्जी हे आठ राज्यांचे संघराज्य होते.

 मिथिलापती जनकाच्या विदेहाच्या पतनानंतर विदेह, लिच्छवी व इतर सहा प्रांताचे मिळून हे वृज्जिसंघराज्य बनले होते. ह्या राज्यात सत्तासंघर्ष सतत सुरू असून मोठा मासा लहान माशाला गिळकृत करतो. या मात्स्यन्यायानुसार सामर्थ्यशाली राज्ये दुर्बल राज्यांना गिळकृत करू लागली. 

या सत्तास्पर्धेत लहान राज्ये व गणराज्ये नष्ट होऊन एकसत्ताक व राजसत्ताक स्वरूपाची मोठी राज्ये व मगध साम्राज्य याचा उदय झाला. 

अशाप्रकारे अनेक राज्यात सोळा महाजनपदे प्रमुख व सोळा महाजनपदातही (१) अवन्ती (२) वत्स, (३) कोशल व (४) मगध हो चार राज्ये प्रसिद्ध आणि या चार मध्येही मगध सर्वश्रेष्ठ व प्रबल राज्य असून त्याचे शेवटी साम्राज्यात रूपांतर झाले .


सोळा महाजनपदांची माहिती खालील साहित्यातून आलेली आहे. 

१) रामायण, महाभारत व पुराणग्रंथांत सोळा महाजनपदांचे उल्लेख येतात. शास्त्रशुद्ध इतिहासलेखनाची परंपरा जरी भारतात नसली तरी महाकाव्ये व पुराणग्रंथांतून या महाजनपदांपैकी काही महाजनपदांची नावे, त्यांच्या सीमा, राज्यांची नावे आलेली आहेत. अर्थात, पुराणग्रंथांच्या त्यासंदर्भातील नोंदीत नेमकेपणा नाही. 

२) जैन ग्रंथ- जैन भगवती सूत्र किंवा ज्या ग्रंथाला 'व्याख्या प्रज्ञाप्रती' या नावाने ओळखले जाते. त्यात सोळा महाजनपदांविषयी माहिती आहे. 

३) दीपवंश, महावंश, जातककथा, महापरिनिर्वाण सूत्र, अंगुत्तनिकाय, दीर्घनिकाय या बौद्ध ग्रंथांतून सोळा महाजनपदांचे उल्लेख आले आहेत.

४) मगध साम्राज्याच्या उदयाच्या शेवटच्या टप्प्यावर ग्रीकांचा भारताशी संबंध आला. ग्रीकांची आक्रमणे झाली. ग्रीक इतिहासकारांनी तत्कालीन भारताच्या राजकीय इतिहासासंबंधी ज्या नोंदी केल्या आहेत त्यातही सोळा महाजनपदांचे उल्लेख आहेत.

५) पाणिनीचा 'अष्टाध्यायी' हा ग्रंथही सोळा महाजनपदांच्या अभ्यासासाठी उपयोगाचा आहे.

६) वाङ्मयीन पुराव्याशिवाय तत्कालीन शिलालेख व नाणीही १६ महाजनपदांच्या अभ्यासासाठी उपलब्ध आहेत. Rhys Davids यांनी लिहिलेल्या Buddhist India या ग्रंथात १६ गणराज्याची विस्तृत माहिती आहे.


महाजनपदांची वैशिष्ट्ये:

1) महाजनपदे ही नद्यांच्या समृद्ध प्रदेशांतच आकारास आली होती. 

2) महाजनपदांचा आकार समान नव्हता. ती काही मोठी तर काही छोटी होती. 

3) प्रत्येक महाजनपदाची प्रशासन व्यवस्था भिन्न भिन्न होती. काहींचे प्रशासन गणतंत्र पद्धतीने चाले तर काहींचे एक राजेशाही पद्धतीने चाले. 

4) काही महादनपदांचे स्वरूप संघराज्यात्मक स्वरूपाचे होते. 

5) यादवी युद्ध हा महाजनसत्तेचा स्थायिभाव होता. 

6) महासत्तांमध्ये शत्रुगट व मित्रगट होते. मित्रगट स्थिर करण्यासाठी महाजनपदांमध्ये विवाहसंबंध होत असत. क्वचितप्रसंगी नातेसंबंधांचा विचार न करता त्यांच्यात युद्धेही होत असत.


'जनपद' व 'महाजनपद' असा उल्लेख तत्कालीन साहित्यात येतो. अनेक गावे व शहरे मिळून जनपद तयार होई. 

अनेक लहान लहान जनपदे मोठ्या जनपदांत विलीन होत असत. मोठ्या 'जनपदाला'च 'महाजनपद' असे म्हणत असत. 

जैन भगवती सूत्रात 16 महाजनपदांची नावे आहेत तर 'महागोविंद सूत्र' या ग्रंथात 7 महाजनपदांच्या राजधानीचे संदर्भ आहेत.

 'अंगुत्तरनिकाय' या बौद्ध ग्रंथात 16 महाजनपदांची माहिती आहे. या 16 महाजनपदांच्या भौगोलिक सीमा, राजांची नावे इ. त्यांच्यातील सत्तास्पर्धा व संबंध आदींबाबतचा इतिहास जुळवण्याचे काम इतिहासकारांनी केलेले आहे. 

या 16 महाजनपदांचा अभ्यास खालीलप्रमाणे करता येईल. 16 महाजनपदांच्या नावांच्या 8 जोड्या प्रसिद्ध आहेत. 

अंग-मगध, काशी-कोसल, वृज्जी-मल्ल, चेदी- वत्स, कुरू-पांचाल, मत्स -शूरसेन, अश्मक- अवंती, गांधार-कंबोज,

जनपद

 


जनपद

जन म्हणजे समान संस्कृतीचे किंवा एका जमातीचे लोक. त्यांनी स्थापन केलेल्या वसाहतींना जनपद म्हणत किंवा जनवस्ती करून राहिलेल्या ठिकाणांना जनपद ही संज्ञा लावण्यात येत असे. वैदिक साहित्यात ग्राम, विश व जन या संज्ञा वेगवेगळ्या स्तरांवरील लोकांच्या समूहांसाठी वापरलेल्या आहेत. अनेक कुटुंबाचे ग्राम होई, अनेक ग्रामांचे मिळून विश होई व या सर्वांचे मिळून जन होई. प्रथम आर्यांचे जीवन भटके होते व त्यांचे जमातींनुसार संघ असत. त्यांतील पाच संज्ञास पंचजन म्हटले आहे. सुदासाने २१ जनांचा पराभव केल्याचा उल्लेख सापडतो. यासच पुढे जनपद म्हणू लागले. त्यांची सुरुवात केव्हा झाली, यासंबंधी लिखित पुरावा उपलब्ध नाही. तथापि छांदोग्य, बृहदारण्यक उपनिषदांत, ब्राह्मणग्रंथ, अष्टाध्यायी, महाभारत, कौटिल्याचेअर्थशास्त्र, बौद्धग्रंथ, मत्स्य, मार्कंडेय, वामन, ब्रह्म इ. पुराणे यातील उल्लेखांवरून असे दिसते की, जनपदे इ. स. पू. १००० पासून अस्तित्वात होती आणि इ. स. पू. चौथ्या शतकापर्यंत त्यांची भरभराट झाली व पुढे गुप्तकाळापर्यंत ती काही प्रमाणात अस्तित्वात असावीत. काही ठिकाणी जनपदाचे लोक व देश असे दोन्ही अर्थ दिले आहेत.

एखादा प्रदेश जिंकून तेथील मूळच्या रहिवाशांना अंकित करून किंवा मुळीच वस्ती नसलेल्या प्रदेशात नव्याने वसाहत करून जनपदांची स्थापना होई. प्रस्थापित करावयाच्या जनपदाचे कौटिल्याने जे वर्णन दिले आहे; त्यावरून असे दिसते की, सामान्यतः एका जनपदास सु. आठशे खेडी व इतर अनेक लहानमोठी गावे असत. जनपदाची राजधानी बहुधा एका किल्ल्यात असे. जनपदाचे दोन प्रकार होते : एकावर राजाचा सत्ता चाले, तर दुसरी गणराज्ये होती. गणराज्यांत शासनाचे विविध प्रकार चालू असत. जनपद राजाधीन वा गणाधीन कसेही असले, तरी त्याचा कारभार सभा व परिषद यांच्या मार्गदर्शनानुसारच चाले. जनपदांचे मध्य, प्राच्य, उदीच्य, दक्षिणापथ, अपरांत, विंध्यपृष्ठ व पर्वत असे सात भौगोलीक विभाग केलेले असत.

प्राचीन राज्यशास्त्रात राज्याच्या सात अंगापैकी (राजा, अमात्य, जनपद, दुर्ग, कोष, दंड आणि मित्र) जनपद हे एक अंग आहे. येथे राज्याचे ग्रामीण भाग व तेथे असलेले लोक असा जनपदाचे अर्थ आहे. बौद्ध ग्रंथात सोळा महाजनपदांचा उल्लेख आहे. ती अशी : अंग, मगध, काशी, कोशल, विदेह, मल्ल, चेदी, वत्स, कुरू, पांचाल, मत्स्य, शूरसेन, अश्मक, अवंती, गंधार व कंबोज. त्यांपैकी काशी, कोशल, विदेह व मगध ही जनपदे विशेष प्रसिद्धीस आली. यांशिवाय इतर अनेक जनपदांचे उल्लेख पुराणांतून आढळतात.अमरकोशात देश, राष्ट्र, विषय, जनपद हे शब्द समान अर्थी योजले आहेत.

ही जनपदे म्हणजे केवळ भौगोलिक विभाग नव्हते; तर प्रत्येक जनपदातील लोकांचे सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय जीवन स्वतंत्र असे आणि स्वतंत्रपणेच विकसित होत होते. प्रत्येक जनपदाची भूमी तिथल्या रहिवाशांची खरीखुरी धात्री अर्थात माता होती. त्यांची भाषाही एकच असे. ते समान देवतांची पूजा-अर्चा व उपासना करीत. त्यामुळे त्यांच्यात भ्रातृभाव वसत असे.

 

देशपांडे, सु. र.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

हिराबाई पेडणेकर:

  हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली "पुरुषानेही स्त्रीवर...