Tuesday, 30 May 2023

प्राचीन भारतातील १२ साम्राज्य भाग ३

 



प्राचीन भारतातील १२ साम्राज्य
भाग ३
४. गौतमीपुत्र सतकरणी (७० एडी - ९५ एडी): प्राचीन भारतात एव्हाना बुद्ध आणि जैन धर्म सर्वदूर पसरला असतांना सातवाहनांचे दक्षिणेतील हिंदू राज्य लक्ष वेधून घेते. २०० बीसी ते २५० एडी असा त्यांचा काळ होता. हिंदू धर्माची पुनःस्थापना यांच्याकरवी झाली. यांच्यात गौतमीपुत्र सतकरणी याचा काळ विशेष लक्षात राहतो. याने शक, यवन, पालव राजांचा पराभव करत आपले राज्य कृष्णेच्या खोर्यापासून काठियावाडपर्यंत, बेररपासून कोकणपर्यंत वाढवले. बुद्ध आणि जैन धर्मीयांना त्याने संरक्षण दिल्याने अनेक स्तुप, लेणी त्याच्या राज्यात उभी राहिली.
५. कनिष्क (साधारण ७८एडी -१०१ एडी): कुशाण वंशातील प्रसिद्ध राजा. भारताच्या वायव्य भागात याचे राज्य होते, आजचे पेशावर राजधानी. क्षत्रपी राज्याच्या स्थापनेचं श्रेय याला जातं. भारतीय, ग्रीक आणि इराणी धर्मांना तो मानत असे पण पुढे यानेही बौद्ध धर्म स्वीकारला. याने कला, साहित्य यांच्या वाढीला प्रोत्साहन दिले. त्याच्या काळातील अश्वघोष, नागार्जुन आणि वसुमित्र हे कवी आणि तत्वज्ञानी प्रसिद्ध आहेत.

No comments:

Post a Comment

हिराबाई पेडणेकर:

  हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली "पुरुषानेही स्त्रीवर...