पोस्तसांभार :: ओंकार ताम्हनकर
सम्राट अशोकाचे राज्यरोहण आणि राज्याभिषेक
अशोकाच्या पूर्व वयासंबंधीची माहिती बौद्ध ग्रंथांतून तसंच दिपवंश व महावंश या सिंहली दंतकथांतून मिळते.
१. अशोकाची आई
अशोकाच्या
आईबद्दलची माहिती फक्त दंतकथांतून मिळते व आज बहुतेक सर्व संशोधकांकडून
तिला अविश्वसनीय असा करार मिळाला आहे. तरी आपण अशोकाच्या आईची धावती भेट
घेऊ.
असं म्हणतात की चंपा नगरीतील एका ब्राह्मणाच्या घरी अशोकाची आई सुभद्रांगीचा
जन्म झाला. ती दिसायला अतिशय सुंदर होती त्यामुळे त्या ब्राह्मणाने तिला
पुढे बिंदूसाराच्या राजवाड्यात पाठविले. तिकडे तिला तिच्या सौंदर्यामुळे
महाराणींकडून हीन वागणूक मिळाली आणि न्हाविणीचे काम तिला देण्यात आले. काही
दिवसांनी शेवटी बिंदूसाराची दृष्टी तिच्यावर गेली आणि त्याने तिच्याशी
लग्न करून तिला आपली १६वी पट्टराणी केले. पुढे सुभद्रांगीला अशोक आणि विगतअशोक अशी २ मुले झाली.
२. अशोकाचे शिक्षण
याबद्दलही फक्त दंतकथाच आल्या आहेत. त्या अशा की,
अशोक
जन्माला आल्यापासून एकदम कुरूप व दुष्ट निघाला त्यामुळे पहिल्यापासूनच तो
बिंदूसाराचा नावडता झाला. यामुळे त्याला इतर राजकुमारांबरोबर बोलू, खेळू
देण्यात येत नसे आणि त्याचे शिक्षणही नीट झाले नाही. परंतु या गोष्टी
तर्काने खऱ्या वाटत नाहीत.
३. तक्षशिला व उज्जैनी
अशोकाची सर्वात पहिली ज्ञात कामगिरी म्हणजे त्याने तक्षशिला येथील मोडून काढलेले बंड.
मौर्य घराण्याविरुद्धचे बंड हे अगदी चंद्रगुप्तांपासून चालून येत असतं.
पुढे बिंदूसाराच्या काळातही अनेक बंड झाले. त्यातलाच एक तक्षशिला येथील
बंड.
तक्षशिला हे सिंधू नदीपासून ३ दिवसांच्या मजलेवर सुप्रसिद्ध स्थान होते. बौद्ध ग्रंथात तक्षशिलाचा उल्लेख 'तक्षशिर' असाही येतो.
बिंदूसाराच्या
काळात इकडे बंड झाला त्यामुळे राजाने राजकुमार अशोकाला बंड मोडण्यासाठी
पाठवले. अशोकाने युद्ध व रक्तपात न करताच बंड मोडून काढले.
यानंतर ३ वर्षे अशोक तक्षशिला मधेच राहिला.
पुढे त्याची नेमणूक उज्जैनी
येथे झाली. काही कथांमधून अशी माहिती मिळते की अशोकाच्या सावत्र आईच्या
सांगण्यावरून अशोकाची नेमणूक पाटलीपुत्रापासून लांब उज्जैनी मध्ये करण्यात
आली. अशोक उजैनी मध्ये असतानाच पुढे इ.स. पूर्व २७३ रोजी बिंदूसाराचा मृत्यू झाला.
४. सिंहसनासाठी संघर्ष व राज्याभिषेक
बिंदूसाराचा मृत्यू इ.स. पूर्व २७३ मध्ये झाला आणि अशोकाचा राज्याभिषेक इ.स. पूर्व २६९ म्हणजे ४ वर्षांनी झाला. यावरून आपण असा तर्क लावू शकतो की ही ४ वर्ष सिंहसनासाठी संघर्ष चालू होता.
तो संघर्ष कसा आणि किती जणांत झाला हे आपण आज ठामपणे सांगू शकत नाही. तरी मी काही मुद्दे मांडतो.
अ. बौद्ध ग्रंथामध्ये म्हटले आहे की अशोकाने आपल्या १०० भावांपैकी ९९ भावांना ठार मारले आणि स्वतःला सम्राट घोषित केले.
आ.
सिंहली दंतकथांमध्ये सुद्धा साधारण असाच उल्लेख आहे की बिंदूसारला १०१
पुत्र होते. पण त्यात १०१ पैकी फक्त ३ पुत्रांची नावं मिळतात.
तिष्य,अशोकवर्धन,सुमल.
इ. तारानाथ म्हणतो की अशोकाने ६ भाऊ मारले.
ई. महबोधिवंश या ग्रंथात म्हटले आहे की अशोकाने सर्व भावांना मारले.
परंतु
या वरील गोष्टींना ठोस काहीच पुरावा मिळत नाही आणि वरून सम्राट बनल्यावर
अशोकाने खोदविलेल्या एका आदेशात सरळसरळ म्हटलं आहे की 'आपले भाऊ पाटलीपुत्र नगरात व अन्यत्रही आहेत.' याचमुळे दंतकथांमधील गोष्टी खऱ्या नसाव्यात असे मला वाटते.
व्हिन्सेंट स्मिथ सुद्धा याबाबतीत हेच म्हणतो की,
"These
fictions were sufficiently refuted by the testimony of the
inscriptions which proves that the brothers and sisters of the king
were still living in the middle of the reign."(पान १९)
या
सगळ्यावरून आपण असं म्हणू शकतो की अशोकाने फक्त अशाच भावांना मारले
ज्यांचे अशोकाबरोबर वैर होते. आणि याच संघर्षामुळे यामुळे बिंदूसाराच्या
मृत्यूनंतर अशोकाला गादीवर बसायला ४ वर्ष लागली.
अशोकाचे हिंदुस्थानातील शिलालेख आणि स्तंभ असलेली ठिकाणे.

No comments:
Post a Comment