पोस्तसांभार :: ओंकार ताम्हनकर
सम्राट अशोकाचा कुलवृत्तांत
मगध! सोळा महाजनपदातील एक महत्वाचे राज्य. सध्याचा भारतातील बिहारचा परिसर म्हणजे पूर्वीचे मगध साम्राज्य.
आतापर्यंत ऐतिहासिक साधनातून मगधाच्या वेगवेगळ्या काळातील एकूण ४ राजधान्या कळतात.
१. महाभारतातील जरासंधाच्या वेळची राजधानी गिरीव्रज(आत्ताचे गिर्यांक),
२. सातव्या शतकातील शिशुनाग वंशावेळची राजधानी राजगृह(आत्ताची राजगिर),
३. राजगृह (दुसरी)
४. सम्राट अजातशत्रूने पाटलीग्राम या गावी गंगा व शोणभद्र यांच्या संगमावर बसवलेली पाटलीपुत्र(आत्ताचे पटना) ही राजधानी.
- अशोकाचे पूर्वज.
जसा
आज बऱ्याच घराण्यांचा कुलवृत्तांत उपलब्ध आहे तसा सम्राट अशोकाचा उपलब्ध
नाही. तरी मिळालेल्या पुराव्यानुसार आपण अशोकाच्या पूर्वजांची उपयुक्त
माहिती काढू शकतो.
१. शिशुनाग
हा शिशुनागाला अशोकाच्या वंशाचा संस्थापक होता. याची कारकीर्द इ.स. पूर्व ७व्या शतकात झाली. याने साधारण ४० वर्ष मगधावर राज्य केलं. या वेळी मगधाची राजधानी वर उल्लेख केल्याप्रमाणे राजगृह ही होती.
२. बिंबिसार
बिंबिसार हा शिशुनागचा पाचवा वंशज. याचा काळ इ.स. पूर्व ५८१ ते इ.स. पूर्व ५५३
असा होता. हा फार पराक्रमी होता. याने मगधाच्या शेजारीच पूर्व हद्दीला
लागून असलेला अंगदेश जिंकून घेतला. (अंगदेश म्हणजे महाभारतात दुर्योधनाने
कर्णाला ज्या भागाचा राजा घोषित केलं होता तो परिसर. आत्ताचा मोघील,
भागलपूर वगैरे परिसर.) या बिंबिसारने कोशल आणि वैशाली या राजघराण्यांशी
संबंध जोडले आणि आपले बळ वाढविले.
बिंबिसारने
पूर्वीची राजधानी राजगृह ज्या डोंगरावर होती ती सोडून डोंगराखालीच एक
नवीन शहर वसवून तिकडे राजधानी हलवली. तिला राजगृहच नाव ठेवले.
३. अजातशत्रू
हा
अजातशत्रू जैन धर्माचे संस्थापक महावीर यांच्या काळात होऊन गेला. याच
अजातशत्रूने मगधची राजधानी राजगृह वरून हलवून पाटलीपुत्र(आत्ताचे पटना)
येथे वसविली.
४. महानंदन
अजातशत्रूनंतर
साधारण १००-१२५ वर्षांनी महानंदन राजा बनला. हा शिशुनाग घराण्यातील
शेवटचा राजा. याला महापद्मनंद नावाचा दासीपुत्र पुत्र होता. या
महापद्मनंदने महानंदनची हत्या केली आणि नंद घराण्याची स्थापना केली.
५. महापद्मनंद
हा
महापद्मनंद फार शूर, पराक्रमी पण तितकाच लोभी आणि निर्दयी होता. याच्याच
काळात अलेक्झांडर हिंदुस्थानच्या हद्दीवर आला होता. हा महापद्मनंद
अलेक्झांडरला हरवण्यासाठी ४०००० हत्ती, २०००० घोडदळ, २ लक्ष पायदळ घेऊन
निघालाही होता परंतु अलेक्झांडर पंजाब प्रांतापर्यंतच थांबला व परत गेला
आणि युद्ध टळले.
८ नंद राजे
महापद्मनंद ला ९ मुलं होती. त्यांच्यानंतर २४ वर्षाच्या काळातच ही ९ मुलं एकामागोमाग एक सम्राट बनून गेली.
६. धनानंद
धनांनंद
हा नंद घराण्यातील शेवटचा राजा. हा सुद्धा क्रूर, जुलमी निघाला. याला
मुरा नावाची दासी होती आणि त्या दासीच्या मुलाचं नाव चंद्रगुप्त.
७. चंद्रगुप्त मौर्य
चंद्रगुप्ताने कौटिल्य चाणक्याच्या मदतीने नंद वंशाचा उच्छेद करून इ.स. पूर्व ३३२ साली मगधाचे राज्य मिळविले. मुरा दासीचा मुलगा म्हणून मौर्य असे नाव त्याने लावले.
चंद्रगुप्तने
नंदांपासून मिळविलेल्या मगध साम्राज्यात वेळोवेळी भर टाकली. पश्चिमेकडील
हिंदुकुशपर्वतापासून हिमालयाच्या पूर्वभागापर्यंतचा प्रदेश आणि
हिमालयापासून दक्षिणेतील चोल, पांड्य, केरळ एवढा प्रदेश त्याने मिळविला.
चंद्रगुप्ताने २४ वर्ष राज्य केले.
व्हिन्सेंट स्मिथ म्हणतात, "Chandragupta became the first strictly historical emperor of India and ruled the land from sea to sea."
म्हणजेच, चंद्रगुप्त अखंड भारताचा पहिला सम्राट बनला ज्याने एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत पसरलेल्या भागावर राज्य केले.
८. बिंदूसार मौर्य.
चंद्रगुप्तानंतर
त्याचा मुलगा बिंदूसार सम्राट बनला. बिंदूसार या नावाचा उल्लेख कुठल्याही
ग्रीक साधनात मिळत नाही, तिकडे नाव अमित्राघात असे येते. परंतु भारतीय
साधनांमध्ये बिंदूसार हे नाव आढळते. अमित्राघात याचा अर्थ शत्रूंचा घात
करणारा असा आहे त्यामुळे ही बिंदुसाराला मिळालेली पदवी असू शकते.
चंद्रगुप्तप्रमाणेच बिंदूसारही अतिशय पराक्रमी सम्राट होता. चंद्रगुप्तांने
त्याच्या काळात बनविलेल्या शत्रूंशी बिंदुसाराने यशस्वीरीत्या सामना
केला.
बिंदूसाराच्या
कारकिर्दीचा जास्त इतिहास उपलब्ध नाही. परंतु आपण तर्क लावू शकतो.
चंद्रगुप्ताच्या काळात सगळाच दक्षिण भारत मगध साम्राज्यात नव्हता आणि पुढे
अशोकानेही फक्त कलिंग जिंकून घेतले त्यामुळे दक्षिण भारत बिंदूसार याने
जिंकला असावा असे दिसते. बिंदूसारने २५(काही साधनात २८) वर्ष राज्य केले
आणि त्याचा इ.स. पूर्व २७३ मध्ये मृत्यू झाला आणि पुढे इ.स. पूर्व २६९ मध्ये अशोक सम्राट बनला

No comments:
Post a Comment