पोस्तसांभार :: ओंकार ताम्हनकर (चरूस्थाळी) साठी प्रोफाइल फोटो
सम्राट अशोकाची कीर्ती
आचार्य चाणक्य यांचे अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करणारा हिंदुस्तानाचा पहिला सम्राट म्हणजे अशोक. अशोकाचे चक्रवर्ती हे उपपद त्याच्या ठायी सार्थ झाले होते हे त्याच्या राज्यविस्तारावरून दिसून येते.
भारतीयांनीच नाही तर अनेक पाश्चात्त्य इतिहासकारांनी सुद्धा अशोकाचे चक्रवर्तीत्व स्वीकारलं आहे.
१. व्हिन्सेंट स्मिथ म्हणतात, "His dominions were far more extensive than British India of to day excluding Burma"
म्हणजे,
आज ब्रिटिश इंडिया हे नाव जेवढ्या प्रदेशाला येते (ब्रह्मदेश वगळून)
त्याच्यापेक्षाही जास्त विस्तृत प्रदेश अशोकाच्या सत्तेखाली होता.
२. रे. मॅकफेल
याने इंग्लंडचा सुप्रसिद्ध राजा आल्फ्रेड दि ग्रेट याच्याशी अशोकाची तुलना
केली आहे. न्यायदानतत्परता, विद्योत्साह, आणि भविकता या बाबतीत
दोघांमध्ये बरेच साम्य दाखवले आहे. परंतु त्याबरोबरच मॅकफेल हे ही कबुल
करतो की आल्फ्रेड दि ग्रेट चे राज्य अशोकाच्या मगधाच्या कितीतरी पटीने
लहान होते.
३. प्रो. ह्रिस डेव्हीड्सने त्याच्या Buddhist India या ग्रंथात ओलिव्हर क्रोमवेलशी अशोकाची तुलना केली आहे.
वरील प्रकारे सम्राट अशोकाची तुलना नेपोलियन, पीटर दि ग्रेट, अलेक्झांडर इत्यादी पाश्चात्य व्यक्तींशी होऊ शकते.
परंतु सम्राट अशोक या सगळ्यांपेक्षाही श्रेष्ठ होता हे आपण म्हणू शकतो. ते कसं?
१.अशोक नेपोलियन सारखा धाडसी शूर महत्वाकांक्षी होता परंतु त्याने महत्वाकांक्षेच्या पायी आपला नाश करून घेतला नाही.
२.पीटर
दि ग्रेट प्रमाणे प्रजेच्या ऐहिक सुखकडेच फक्त अशोकाची दृष्टी नव्हती.
ऐहिक सुखाबरोबरच अध्यात्मिक आणि नैतिक उन्नती कशी साधावी हे त्याने
उपदेशांकरवी दाखविले.
३.अलेक्झांडरने
दिग्विजय केला. अशोकानेही कलिंगविजय केला. पण सगळा भारत खंड आपल्या
स्वामित्वाखाली आल्यानंतर आता जिंकण्यास काही उरले नाही म्हणून तो
अलेक्झांडर प्रमाणे शोक करत बसला नाही. उलट दिग्विजयाहूनही श्रेष्ठ असा
आत्मविजय त्याने करून दाखविला.
याच प्रमाणे सेंट पॉल, अरबस्तानचा पहिला म्हालिफा उमर, मुघल बादशाह अकबर या सगळ्यांच्या तुलनेत सम्राट अशोकच श्रेष्ठ ठरतो.
अशोकाची
कीर्ती शोधायची झाली तरी ती त्याच्या अफाट राज्यविस्तारात, अतुल
ऐश्वर्यात, अपरंपार संपत्तीत, कलिंग विजयात दिसून येतेच, परंतु याचबरोबर
त्याच्या अंतःकरणाच्या औदार्यात, हृदयाच्या ऐश्वर्यात, त्याच्या अतुल
त्यागबुद्धितही दिसून येते.
कंगनहल्ली येथील अशोकाचे त्याच्या २ पत्नींबरोबरचे शिल्प.

No comments:
Post a Comment