पुराना किल्ला - दिल्ली #पुढचीमोहीम
लेखन :सौरभ माधुरी हरिहर कुलकर्णी
आपल्या भारत देशाची राजधानी असलेल्या दिल्ली या शहरातील इंद्रप्रस्थ या परिसरात पुराना किल्ला आहे. हा पुराना किल्ला म्हणजे पांडवांची प्राचीन नगरी असा काही उत्खननात मिळालेल्या अवशेषांतून दिसून येते. हा किल्ला नवी दिल्ली रेल्वे स्थानकापासून ६ कि.मी. अंतरावर आहे. किल्ला यमुना नदीच्या काठावर आहे. किल्ल्याची तटबंदी, बुरूज, प्रवेशद्वार आजही मजबूत अवस्थेत आहे. किल्ल्यामध्ये आपण ज्या भव्य प्रवेशद्वारातून प्रवेश करतो त्याला "बडा दरवाजा" असे म्हणतात. किल्ल्याला अजून २-३ प्रवेशद्वार आहेत. हुमायू दरवाजा, पश्चिमी दरवाजा, उत्तर दरवाजा असे इतर दरवाजे आहेत. आत मशीद, हमामखाना व इतर काही वास्तू आहेत. सुंदर अशी पायविहीर आहे.
उपलब्ध ऐतिहासिक साधानांनुसार किल्ल्याची उभारणी इ.स. १५३८ मध्ये मुघल शासक हुमायून याच्या काळात झाली. पुढे इ.स. १५५६ मध्ये राजा हेमचंद्र विक्रमादित्य यांनी अकबराचा पराभव करून हा किल्ला जिंकला. नंतर पुढे मुघलांच्या ताब्यात हा किल्ला आला. पुढे दुसऱ्या महायुद्धात पण किल्ल्याचा वापर झाला. भारताच्या स्वातंत्र्यावेळी किल्ल्याचा उपयोग निर्वासित छावणी म्हणून करण्यात आला.
टीम - पुढची मोहीम



















No comments:
Post a Comment