Monday, 21 August 2023

लाल किल्ला - दिल्ली

 

लाल किल्ला - दिल्ली #पुढचीमोहीम
लेखन ::सौरभ माधुरी हरिहर कुलकर्णी










आपल्या भारत देशाची राजधानी असलेल्या दिल्ली या शहरातील चांदणी चौक परिसरात लाल किल्ला उभा आहे. भारताच्या स्वातंत्र्य संध्येला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूजींनी पहिल्यांदा आपला राष्ट्रध्वज तिरंगा फडकविला होता. तेव्हापासून प्रत्येक १५ आॕगस्टला म्हणजे स्वातंत्र्य दिनी आपले मा. पंतप्रधान ध्वजारोहण करतात. एकदम बुलंद असलेला हा किल्ला जवळपास २५० एकरात विस्तारलेला आहे. किल्ल्याचे बांधकाम मुघल शासक शहाजहान याच्या काळात झाले आहे. इ.स. १२ मे १६३९- ०६ एप्रिल १६४८ या कालावधीत बांधकाम अहमद लाहोरी या वास्तुतज्ञाने केले. किल्ल्याभोवती खंदक आहे.
किल्ल्याला २ मुख्य प्रवेशद्वार आहेत १.दिल्ली दरवाजा २.लाहोरी दरवाजा. किल्ल्यात प्रवेश करताना लागणारा लाहोरी दरवाजा जवळपास ११० फूट उंच आहे. एकदम भव्य आणि मजबूत आहे. आतमध्ये प्रवेश केल्यावर छत्ता चौक लागतो. पुढे नुबतखाना म्हणजे आपला नगारखाना लागतो. आतमध्ये भव्य परिसर आहे. आतमध्ये दिवाणखाना म्हणजे दिवाण ए आम आहे. मुमताझ महाल, रंग महाल, खास महाल, हिरा महाल अशा अनेक वास्तू आहेत. अंघोळ करण्यासाठीची जागा म्हणजे हमाम आहे. किल्ल्यात एक पायविहीर आहे.
किल्ल्यावर सुरवातील मुघलांची सत्ता होती. इ.स. १७७१- १८०३ या कालखंडात मराठ्यांची सत्ता किल्ल्यावर होती. इ.स.१७३९ मध्ये नादीरशहाने आक्रमण केले तेव्हा किल्ल्याची नासधूस केली होती नंतरच्या काळात इ.स. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरावेळी इंग्रजांनी किल्ल्याची अजून नासधूस केली.
टीम - पुढची मोहीम

No comments:

Post a Comment

हिराबाई पेडणेकर:

  हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली "पुरुषानेही स्त्रीवर...