सिंधू संस्कृती -भाग 3
पोस्तसांभार :Dr Sitaram Ingole
धार्मिक जीवन
सिंधू संस्कृतीतील धार्मिक जीवनाबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नाही किंवा एकही मंदिर उत्खननात मिळालेले नाही .शिक्के मुद्रा मूर्ती या अवशेषांच्या द्वारे संशोधकांना धार्मिक जीवन सिंधू संस्कृती मध्ये मानव हा धार्मिक असावा व तो खालील देवतांच्या पूजा करत असावा.
सिंधू संस्कृतीतील देवता
मातृदेवता शक्ती
तेथे उत्खननात विपुल स्त्रीमूर्ती व मुद्रा मिळाल्या आहेत .बहुतेक त्या अर्धनग्न अवस्थेत असून त्यांच्या अंगावर दागिने आहेत. काहींच्या हातात दीपक आहेत .यावरून एखादी देवी या संस्कृतीतील आराध्य दैवत असावे असे संशोधकांना वाटते .देवीला नरबळी सुद्धा देण्यात येत असावा. त्यामुळे तेथे देवीची उपासना करीत असावेत.
पशुपती शिव
अनेक पुरुषआकृती उत्खननात सापडले आहेत. त्यापैकी एका मुद्रेवरील पुरुषआकृतीला एक डोके, दोन शिंगे व तीन तोंडे आहेत ,तो मांडी घालून ध्यानस्थ बसलेला आहे व त्याच्या सभोवती हत्ती ,वाघ , मैस ,गेंडा ,हरिण पाच प्राणी आहेत. योग मुद्रा वरून आणि सभोवतालच्या पशु वरून ही देवता योगिराज पशुपती असावी .असे मत डॉ. मार्शल यांनी मांडले आहे .तसेच प्रतिमेच्या डोक्यावर तीन तोंडाची, तीन नेत्र आणि डोके व त्याच्या बाजूला दोन शिंगे, यांचा त्रिशूळ करून ही देवता शंकर महादेव अथवा शिव असावी असेही प्रतिपादन करण्यात आले. पण शंकराजवळ पार्वती मात्र कुठेही आढळलेली नाही.
पशु पूजा
वृषभ (बैल ) नाग इत्यादी प्राण्यांची सुद्धा पूजा करण्यात येत असे.
वृक्ष पूजा
वड, पिंपळ इत्यादी वृक्षांची पूजा करीत असत.
लिंग पूजा
लिंग व योनी यांच्या आकाराच्या मिळालेल्या अनेक वस्तू वरून लिंग पूजेला धर्मात प्राधान्य होते असा निष्कर्ष संशोधकांनी काढला.
निसर्ग पूजा
सूर्य ,जल इत्यादी निसर्ग शक्तींची ही आराधना त्यावेळी करण्यात येत असावे.
मृतदेहांची व्यवस्था
मृत शरीराची व्यवस्था तीन प्रकारे लावण्यात आलेली होती.
1.पूर्ण दफन यात मृताच्या नेहमीच्या उपयोगाच्या वस्तू सह प्रेत जमिनीत पुरले जात असावे.
2.अस्थी दफन यात अपघात पशु व युद्ध यामुळे ठार झालेल्या व्यक्तींची प्रेते पशु पक्षांनी खाल्ल्यावर त्यांची हाडे जमिनीत पुरत असावेत.
3.दहनानंतर असती व रक्षा दफन या पद्धतीत प्रेताचे दहन केल्यावर त्याची रक्षा वस्ती मृत्तिका कलशात भरून ती जमिनीत पुरत असत.
सिंधू धर्माचा हिंदू धर्मावर प्रभाव
सिंधू धर्मातील शक्ती ,शिव ,पशु ,लिंग ,वृक्ष ,सूर्य, इत्यादी देवता हिंदू धर्मातही आढळतात .तसेच सिंधू धर्मातील स्नानाचे महत्त्व बळी प्रथा प्रार्थना इत्यादी हिंदू धर्मातही आहेत. ग्रामीण भागातील लोकांच्या देवदेवता धार्मिक चालीरीती या सिंधू धर्मा सारख्याच आढळतात .यावरून सिंधू संस्कृतीतील धर्मीक जीवनाचा हिंदू धर्मावर महत्त्वाचा प्रभाव हा पडलेला दिसून येतो.
आर्थिक जीवन
सिंधू संस्कृती ही नागरी संस्कृती होती नगरे समृद्ध होती व नगरांना आर्थिक जीवनात प्राधान्य होते.
कृषी व पशुपालन
सिंधू व तिच्या उपनद्यांच्या परिसरातील गाळाची सुपीक जमीन ,विपुल जलपुरवठा आणि अनुकूल हवामान यामुळे शेती हा येथील निवास यांचा प्रमुख व्यवसाय बनला. गहू, तांदूळ, वाटाणा ,कापूस इत्यादी पिके काढीत व शेतीच्या कामासाठी पशूंचा उपयोग करण्यात येत होता. ्यासाठी गाई ,बैल, म्हैस ,हत्ती, उंट, मेंढ्या, बकर्या, कुत्रे इत्यादी प्राणी पाळत होते व त्या प्राण्यांचा उपयोग शेतीसाठी, शिकारीसाठी व वाहतुकीसाठी करत होते व त्यांच्यापासून खत, दूध, मास ,कातडी, लोकर इत्यादी मिळवत असत. त्यावेळेस घोडा हा परिचित प्राणी होता पण त्याचा उपयोग कुठेही आढळला नाही.
उद्योग
उत्खननात सापडलेल्या विविध वस्तू वरून अनेक हस्तोद्योग चालत असत असे सिद्ध होते.
विणकाम
सिंधू संस्कृती कापूस व लोकर यांचे सूत व कापड तयार करणारा विणकाम वर्ग होता. तो रंगीबेरंगी कापड तयार करून इराण ग्रीस इत्यादी देशात सुद्धा निर्यात करत होता.
कुंभार काम
चक्रा च्या साह्याने विविध प्रकारचे मृत्तिका कुंभ व इतर मृत्तिका कृती तयार करण्याचे काम कुंभार करीत असे . मातीची भांडी चकचकीत बनवीत होते ,रंगवीत होते ,नक्षीदार करत होते. तसेच मातीची खेळणी इतर कला वस्तू सुद्धा त्या काळात कुंभारी कला म्हणून प्रगत होती.
सुतार काम
शेतीची उपकरणे, लाकडी खेळणी ,बैलगाडी, नौका इत्यादी बनवणारा सुतार वर्ग होता.
धातुकाम
सोने-चांदी इत्यादी धातूंचे अलंकार, शिक्के आणि इतर कलाकृती तयार करणारे सुवर्णकार त्या काळात होते याशिवाय पाथरवट, गवंडी हे सुद्धा व्यवसाय करणारे लोक होते.
व्यापार
सिंधू संस्कृती मध्ये भूमार्ग व समुद्रमार्ग यांनी वास्तूंचा व्यापार करण्यासाठी देश-विदेशात व्यापार करणारा व्यापारी वर्ग होता. त्याठिकाणी व्यापारी पेठा होत्या कश्मीर ,काठेवाड, राजपुताना ,दक्षिण भारत असा देशी व्यापार व अफगाणिस्तान ,इराण ,सुमेरिया, मेसोपोटेमिया, असा विदेशी व्यापार चालत असे. त्यासाठी बैल गाढव इत्यादी प्राण्यांचा वापर करत होते.
वजने व मापे समान
वस्तूंच्या देव देवी साठी उपयोगात आणलेली लहान-मोठी वजने व मापे सर्वत्र सारखी होती. यावरून व्यापारातील व्यापार्यांचा प्रामाणिकपणा व सचोटी यातून दिसून येते.
विनिमयसाधन
व्यापारी देश विदेशी व्यापार वस्तुविनिमय याच्या स्वरूपाचा करत होते. मौल्यवान धातूंच्या देशी विदेशी मुद्रा सुद्धा विनिमय साधन म्हणून वापर करण्यात येत होत्या .ह्या विदेशी मुद्रा उत्खननामध्ये सापडल्या आहेत.
क्रमश,......

No comments:
Post a Comment