भाग ७
१२. राजेंद्र चोलाः राजराजाचा हा मुलगा. आपल्या पित्याप्रमाणेच राज्य वाढवणे आणि उत्तमपणे चालवणे हे काम त्याने केले. भारताच्या पूर्वेकडे राज्य वाढवण्याचे तसेच सेन वंशाचे साम्राज्य पूर्वेत स्थापन करण्याचे श्रेय याला जाते. ३४० विद्यार्थी आणि १४ शिक्षक असलेली वेदिक शिक्षण संस्था याने सुरु केली होती. गंगाईकोंडा चोलापूरम ही त्याची राजधानी होती. या ठिकाणी काही देवळे आणि महाल त्याने बांधले. त्याच्या राज्यात शेतीसाठी पाण्याची सिंचनव्यवस्था होती.
अशा तर्हेने प्राचीन भारताने जवळपास १५०० वर्ष अनेक जाती आणि वंशाच्या राजवटी बघितल्या. धार्मिक सामंजस्य, उत्तम प्रशासन, कुशल नेतृत्व आणि साहित्य, कला, शास्त्र यांचा विकास या काळात भारताने बघितला. आज भारतातील अनेक धर्म, पंथ, भाषा आणि चालीरीती यांचे मूळ वरील सर्व राज्यकर्त्याच्या काळात रोवले गेले. ती मूळे एवढी खोलवर गेली की पुढील मुगल आणि ब्रिटिश काळातपण आपली संस्कृती पुसली गेली नाही.

No comments:
Post a Comment