सह्याद्रीच्या पर्वत रांगा ह्या गडकिल्ले व पर्यटन स्थळे म्हणून आपण नेहमी पाहतो पण त्याच सह्याद्रीच्या कुशीत असंख्य ऐतिहासिक वास्तू लपलेल्या आहेत आणि त्या पाहण्यासाठी आणि तिथलं इतिहास जाणून घेण्यासाठी नेहमीच इतिहास प्रेमी उत्सुक असतात असाच एक अपरिचित वास्तूची माहिती आपण घेऊ.
#शंभू महादेव मंदिर*
300 वर्षांपूर्वीची ही गोष्ट मराठशाहीचे सरदार मल्हारराव होळकर एकदा आपल्या सर्व लवाजम्यासह मोहिमेवर असताना चास गावाच्या थोडंस पुढं आणि आत्ताच्या चास कमान धरणक्षेत्र जवळ शंभू महादेवाचा डोंगर आहे त्यावर ससैन्य चढाई करून वर गेले होते, वास्तविक या डोंगराचा आकार पिंडीच्या आकारासारखा असल्याने त्याला शंभू महादेवाचं डोंगर म्हणायचे.मुळात महादेवाला प्रचंड मानणाऱ्या मल्हाररावांनी आपलं सैन्य त्या डोंगरावर आरामासाठी थांबवल असता त्या ठिकाणी त्यांना तब्बल चार शिवलिंग जमिनीतून वर आलेली दिसली मल्हाररावांनी त्या डोंगरावर एक आकर्षक महादेवाचं मंदिर बांधून त्या डोंगराचा जणू जीर्णोद्धार केला.त्यानंतर सरासरी 1884 ते 1887 च्या सुमारास मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार करून त्याला चिरेबंदी चावडी बनवली गेली.( वरील गोष्टीचा संदर्भ म्हणजे वन विभागाने मंदिर परिसरात लावलेला माहिती फलक)
मंदिर आत्ताच्या अवस्थेत पाहिलं चिरेबंदी तटबंदी व चावडी च बराचसा भाग पाडून नवीन बांधकाम करण्याचं काम चालू आहे.मंदिरासमोर आकर्षक नंदी असून मंदिराचा सभामंडप हा पूर्वी लाकडी कलाकुसरी मध्ये होता तो पाडून आता भिंती बांधल्या असल्या तरी अजूनही काही भिंतीत लाकडी नक्षीकाम दुसून येतंय, सभागृहाच्या लाकडी बांधकामातील नक्षी अजून पाहायला मिळते. मंदिरासमोर लहान लहान मुर्त्या आहेत तसेच मंदिरात राम लक्ष्मण यांच्या पण नवीन घडणीत बनवलेल्या मुर्त्या आहेत.मंदिराच्या बाहेरच्या बाजूला एक लहान एक खांबांची दीपमाळ व चुन्याच्या घाण्याच चाक पडलेलं आहे.मंदिरच पूर्वीच लाकडी बांधकाम अतिशय आकर्षक असून नक्षी अजून पुरातन संस्कृती चा दाखला देते.मंदिराच्या गाभाऱ्यात चार शिवलिंग असून शंकर पार्वती यांच्या मुर्त्या पण आहेत.मंदिरा बाहेर हनुमानाची मूर्ती आहे.तिच्या समोर महादेवाला वाहिलेले लहान मोठे नंदी आहेत.मंदिराकडे डोंगर चालून जाताना मध्य भागी एक समाधी असून त्यावर पादुका कोरल्या आहेत येणारे जाणारे हौशी लोक त्या समाधीवर दगडाचे बारीक पिरॅमिड तयार करतात.
मंदिर लहानच पण खूप आकर्षक असून ऐतिहासिक आहे.
चास कमान मार्गे भीमाशंकरला जाताना रोड वरच मंदिराच्या नावाचा व माहितीचा फलक वन विभागाने लावलेला आहे त्यामुळे मंदिर शोधायला जास्त कष्ट घयावे लागत नाहीत पण डोंगर चढाई करायला छोटा आहे व दगडी पायऱ्या असल्याने चढाई सोपी आहे. अवश्य भेट द्यावी अशी वास्तू व परिसरात प्रसिद्ध महादेव मंदिर आहे.त्याविषयी कोणाला संदर्भ सह माहिती असेल तर संपर्क करु शकता.
#लेखन,शब्द रचना : #मंगेश_गावडे
No comments:
Post a Comment