Wednesday, 6 March 2024

कर्नाटक राज्यातील गोकर्ण जवळील उत्तर कन्नडाचा 'मिर्जान किल्ला’...

 


कर्नाटक राज्यातील गोकर्ण जवळील उत्तर कन्नडाचा 'मिर्जान किल्ला’...
मिर्जान या किल्ल्याचे प्रथम ऐतिहासिक दृष्टान्तात नवेथ एस्पर इब्नबट्टाुता यांनी बांधलेल्या या किल्ल्याची निर्मिती प्रथम १२०० च्या सुमारास नवाथ सल्तनतने केली होती... त्यानंतर ते विजयनगर साम्राज्याखाली आले त्यानंतर १६०८ मध्ये भारताच्या पुरातत्त्व सर्वेक्षण ताड्री क्रीकच्या दक्षिण-पूर्व किनारपट्टीवर १६०८-१६४० च्या कालखंडापर्यंत त्याचे बांधकाम केले...
आणखी एक गोष्ट अशी की कि किल्ला विजयनगर साम्राज्याच्या शासकांच्या नेतृत्वाखाली होता... या साम्राज्याच्या पश्चात झाल्यानंतर विजापूर सुल्तानांनी किल्ले जिंकले आणि गोवाचे तत्कालीन राज्यपाल शरिफ-उल-मुल्क यांना किल्ल्याचे बांधकाम किंवा नूतनीकरण करण्याचे श्रेय दिले जाते...
मिर्जान त्यांच्या राजवाड्याचे स्थान होते १७ व्या शतकात कैलडी राजवंशाने स्वतंत्र राजवटीचा दर्जा दिला आणि त्यानंतर मिरजानच्या दक्षिणेस कन्नराचा प्रदेश, त्याच्या राजधानीने बेडनुर येथे राज्य केले. १६७६ मध्ये कैलडी रान चिन्नमम यांनी मिर्जेनपर्यंत हा प्रदेश ताब्यात घेतला होता...
१७५७ मध्ये, मराठ्यांनी मिर्झन किल्ला जप्त केला होता १७५५ मध्ये बेदनूरचा शेवटचा शासक बासप्पा नाईक याच्या मृत्यूनंतर हा किल्ला पकडला गेला.. या घटनेमुळे त्याच्या १७ वर्षांच्या दत्तक पुत्र चाणबासावीय यांचे प्रतिनिधीत्व झाले तिच्या दत्तक मुलाला तिच्या “जार” घेण्याचा विरोध केल्यामुळे तिने त्याला खून केले यामुळे संतप्त स्थानिक लोकांनी बंड केला आणि मराठ्यांनी किल्ला जिंकून घेतला त्या परिस्थितीचा फायदा घेत होता....
मे १७८३ ते मार्च १७८४ दरम्यान ब्रिटिशांनी मेजर तोररिओनच्या नेतृत्वाखाली हा किल्ला ताब्यात घेण्यापूर्वी होणपती पर्यंत नेले होते....
डे बॅरोस, बारबोसा, हैमिल्टन आणि बुकानन यासारख्या इतिहासातील क्रोनिकर यांनी मेगनच्या नावाखाली विजयनगर राजांच्या अधिपत्याखाली किल्ल्याचा इतिहास नोंदवला आहे १७२० मध्ये हॅमिल्टन एक लहान पोर्ट म्हणून त्याचे महत्त्व दर्शवितो ज्याचा वापर मिरपूड, कॅसिया, खनिज पदार्थ आणि जंगली जायफळ यांच्या निर्यातीसाठी केला जातो. १८०१ मध्ये बुकानन यांनी ‘मिडिझॉय’ हे ठिकाण ‘मिडीजॉय’ म्हटले...
📷✍🏽 @sachinpokharkar_

Thursday, 1 February 2024

हम्पी! विजयनगर साम्राज्याची राजधानी!!

 











हम्पी!
विजयनगर साम्राज्याची राजधानी!!
या प्रदेशाचा इतिहासाशी असलेला संबंध हा पार रामायणापर्यंत जाऊन पोहोचतो. सुग्रीवाची किष्किंधानगरी ती हीच असं मानलं जातं. अजूनही हनुमंताचं जन्मस्थान म्हणून इथला अंजनाद्री पर्वत दाखवला जातो.
पुढे, पुराणांव्यतिरिक्त प्रत्यक्ष लिखित इतिहासाची पानं आपण चाळून पाहतो तेव्हा सुरुवातीचे त्रोटक उल्लेख मिळतात ते मगधसम्राट अशोकाचे, इ.स.पूर्व तिसऱ्या शतकातले. पुढे, बदामीच्या चालुक्य राजवंशात या प्रांताला वैभव प्राप्त होऊ लागलं. या वेळेस या भागाचा उल्लेख 'पंपापुरा' असा आढळतो. पंपा हे शिवपत्नी पार्वतीचं नाव. या शब्दाचं कन्नड रूप अथवा अपभ्रंश झाला हम्पा, अन त्याचंच पुढे आजचं रूप म्हणजे हम्पी!
दहाव्या शतकात हम्पीतलं प्रसिद्ध विरुपाक्ष मंदिर कल्याणीच्या चालुक्यांनी बांधलं. अत्यंत विशाल, महाप्रचंड गोपुर असलेलं हे मंदिर, त्यासमोरचा बाजार अन जवळपास एक दीड किलोमीटरवर असलेला अवाढव्य नंदी हे त्याचं वैशिष्ट्य!
चालुक्यांच्या नंतर तेराव्या-चौदाव्या शतकात आलेले होयसळ राजे हे प्रामुख्याने शैव असल्याने त्यांनी इथे मोठ्या प्रमाणावर शिव-पार्वती-दुर्गा इत्यादी देवीदेवतांची मंदिरं बांधली. दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजीने दक्षिणेत होयसळांवर आक्रमण केलं, अन पाठोपाठ आलेल्या महम्मद बिन तुघलकाने त्यांची राजधानी द्वारसमुद्र तथा हळेबिडू जिंकून घेतली. या साऱ्या धकाधकीत, काम्पिली नावाच्या लहानशा राज्यात असलेली ही हम्पी देखील आक्रमणाला बळी पडली.
पुढे, काही काळातच हक्क उर्फ हरिहर आणि बुक्क या दोघा भावांनी शृंगेरी-शारदा पिठाच्या शंकराचार्य असलेल्या विद्यारण्यस्वामींकडून आशीर्वाद घेऊन नव्या साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली. असं म्हटलं जातं की हे दोघेही होयसळ साम्राज्याच्या सैन्यात होते. काही ठिकाणी हे काकतीय राजांकडे असल्याचंही म्हटलं आहे. असो, इ.स. १३३६ मध्ये या नव्या हिंदू साम्राज्याचा शुभारंभ झाला. देवराया, अच्युतराया वगैरे एकाहून एक प्रतापी राजांनी या विजयनगर साम्राज्याचा डंका उत्तरोत्तर निनादलाच, पण या साऱ्याचा कळस ठरला तो प्रसिद्ध सम्राट कृष्णदेवराया! आजही, हम्पीच्या हजारराम मंदिराला लागून असलेल्या खास महालांमध्ये असलेली जागा, कृष्णदेवरायाचा महाल, राजसभा वगैरे पाहता हे किती प्रचंड असेल याची कल्पना येते.
प्रत्येक मंदिर भव्य, त्याचे खांब निरनिराळ्या मूर्ती आणि कलाकुसरींनी नटलेले. बोट ठेवायला कुठेही जागा नाही. मूर्तींचे हावभाव असे, की जणू काही दगड जिवंत होऊन त्या सुरसुंदरी नाजूक पदन्यास करत नाचू लागतील, ते द्वारपाल आत जाण्यास अनुमती देतील, ते निरनिराळे वादक-नर्तक आपली कला सादर करू लागतील. बाबासाहेबांनी म्हटलंय तसं खरंच, या कलाकारांच्या हातात जादू होती. इथे कलाकारांनी दगडांना हसायला लावलं, नाचायला लावलं, लाजयला लावलं!
दुर्दैवाने, १५६५ साली, तालिकोटा तथा राक्षसतागडी इथं विजयनगरचा अखेरचा सम्राट आलिया-रामरायाच्या विरोधात साऱ्या बहमनी सुलतानी सत्ता एकत्र आल्या आणि विजयनगरचा पराभव झाला. पुढचे जवळपास सहा महिने विजयनगरची ही वैभवशाली राजधानी जळत होती, लुटली जात होती! मुर्त्या फुटत होत्या, कला नष्ट होत होती.
पण किती नष्ट करतील? जवळपास सोळा चौरस मैल परिसरात पसरलेली ही वैभवशाली नगरी! जिथे जाऊ तिथे मंदिरं आणि कला. सुलतान कंटाळले, पण कला-मंदिरं संपली नाहीत. ती अजूनही आहेत. कितीही बघा, कितीही वेळ थांबा, मन भरत नाही. आत्ताच हे असं आहे, तेव्हा काय असेल हा विचार मनात येतो अन् मती गुंग होते.. शब्दच संपतात! खरच, शब्द अपुरे पडतात..
खाली काही मोजके फोटो देतो आहे, बाकी याहून कित्येक अजूनही कॅमेरात तसेच आहेत, सगळे देणं अशक्य आहे! हे स्क्रीनवर नाही, जाऊन अनुभवणं गरजेचं आहे. काय लिहू अजून?
- कौस्तुभ कस्तुरे

Saturday, 27 January 2024

झारखंड राज्यातील डाल्टनगंज शहराजवळील पलामू किल्ला.

 

२८ जानेवारी १७७१...
 
झारखंड राज्यातील डाल्टनगंज शहराजवळील पलामू किल्ला...
लेखन :सचिन पोखरकर


मैदानी भागातील जुना किल्ला चेरो राजवंशाच्या आधीपासून अस्तित्त्वात होता जो रक्सेल घराण्याच्या राजाने बांधला होता...
डाल्टनगंजजवळ शेरशाह सूरी मार्गावरील पलामूच्या जंगलात खोलवर हे दोन मोठे किल्ले आहेत मैदानामधील मूळ किल्ला आणि लगतच्या डोंगरावरचा दुसरा किल्ला चेरो वंशातील राजांना देण्यात आला आहे मैदानावरील किल्ल्याला तीन बाजूंनी आणि तीन मुख्य दरवाजांवर संरक्षण होते नवीन किल्ला राजा मेदिनी रे यांनी बांधला होता स्थापत्य रचना इस्लामिक शैलीमध्ये आहे जे दौड खानचा विजय प्रतिबिंबित करते मैदानी भागातील जुना किल्ला चेरो राजवंशाच्या आधीपासून अस्तित्त्वात होता रकसेल राजा राजपूत घराण्याच्या राजाने बांधला होता तथापि हे राजा मेदिनी रेच्या शासनकाळात होते (मेदिनी रायलाही असे म्हणतात) ज्याने पलामाऊमध्ये १६५८ ते १६७४ पर्यंत तेरा वर्षे राज्य केले जुना किल्ला पुन्हा बचावात्मक रचनेत बांधला गेला एक चेरो आदिवासी राजा होता त्याचा नियम दक्षिण गया आणि हजारीबागमधील भागात विस्तारला त्याने रांचीपासून नवरतनगड (३३ मैलांवर अंतरावर) म्हणून ओळखल्या जाणार्‍या डोईसावर हल्ला केला आणि नागवंशी राजा रघुनाथ शाहचा पराभव केला युध्दाच्या मोबदल्यात त्यांनी सात बारवा जवळील खालचा किल्ला बांधला आणि जिल्ह्याच्या इतिहासात हा किल्ला प्रसिद्ध झाला...
सन १६१३ मध्ये राकसेल राजपूत राजवंशच्या राज्यकर्त्यांनी भगवंत रायच्या नेतृत्वात रेर आणि चैनपूरच्या ठाकुरांचा पूर्वज राजपूत सरदारांच्या मदतीने चेरोवर आक्रमण केले जेव्हा राकसेल राजा मान सिंह त्यावेळी पालामूचे राज्य करीत होते भगवंत राय यांनी सत्ता काबीज केली ही बातमी समजताच राजा मान सिंहने पलामूचे राज्य परत मिळविण्याचा प्रयत्न केला नाही तो सुरगुजा येथे परतला आणि सरगुजाच्या राकसेल राजपूत घराण्याची स्थापना केली ब्रिटीश राजवटीच्या काळात सूरगुजा राज्य हे मध्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक होते...
गडावर हल्ला करण्यासाठी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या पाटणा परिषदेची सोय केली २८ जानेवारी १७७१ रोजी कॅप्टन कॅमकने जेव्हा नवीन किल्ल्यावर हल्ला केला तेव्हा चेरो सैनिकांनी जोरदार लढाई केली परंतु पाण्याच्या कमतरतेमुळे जुन्या किल्ल्याकडे माघार घ्यावी लागली...

Thursday, 25 January 2024

श्रीमंत छत्रपती शाहू (शहाजी) उर्फ जंगली महाराज :

श्रीमंत छत्रपती शाहू (शहाजी) उर्फ जंगली महाराज :
लेखन ::© श्रीमंत खेळोजी विठोजी राजे भोसले प्रतिष्ठान, वावी



 
 
हे जंगली महाराज अध्यात्मिक क्षेत्रातील नावाजलेले जंगली महाराज नाहीत. तर श्रीमंत जंगली महाराज म्हणजे स्वराज्याचे छत्रपती शाहू महाराज धाकटे यांचे लहान बंधू, स्वराज्यासाठी, छत्रपतींसाठी पराक्रमाची पराकाष्ठा करणारे स्वराज्याचे सेनापती श्रीमंत चतुरसिंग राजे भोसले वावीकर यांचे नातू . श्रीमंत चतुरसिंग राजे भोसले यांचा वारसा समर्थपणे चालवणारे स्वराज्याचे सेनापती श्रीमंत बळवंतराव राजे भोसले यांचे चिरंजीव.
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी ७ डिसेंबर १८३९ ला काशीला प्रयाण केले. तेव्हा त्यांच्यासोबत त्यांच्या दोन महाराणी, कन्या गोजराबाई साहेब, श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती, त्यांची पत्नी गुणवंताबाई साहेब , सेनापतीचे काका - श्रीमंत छत्रपती शाहू महाराज धाकटे यांचे लहान बंधू श्रीमंत परशराम राजे भोसले वावीकर, महाराजांना मानणारे सर्व आप्तेष्ठ होते. या प्रवासात खान्देशात सांगवी मुक्कामी १२ जानेवारी १८४० रोजी श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती यांची पत्नी गुणवंताबाई साहेब प्रसूत होऊन त्यांनी एका मुलाला जन्म दिला. त्याचे नाव त्रिंबकजी असे ठेवण्यात आले. जंगलात जन्म झाल्याने त्यांना जंगली महाराज हे नाव पडले. त्यांच्या जन्माचा कुठला उत्सव तर सोडा साधा आराम सुद्धा न करू देता इंग्रज अधिकाऱ्याने भोयांना पालखी उचलण्याचा इशारा केला. पालख्या काशीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या.
श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती यांना ताप येऊ लागला होता. इंग्रज अधिकाऱ्याने त्यांच्यावर कुठलाही औषधोपचार करू दिला नाही. ज्वर वाढत गेला. मुलगा झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांनी २७ जानेवारी १८४० ला स्वराज्याचे सेनापती आपल्या तान्ह्या मुलाला परकं करून, गुणवंताबाई साहेब यांना विधवा करून इहलोकी गेले. मध्य प्रदेशातील महू जवळील तिकुराई येथे स्वराज्याच्या सेनापतींचे श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती उर्फ बाळासाहेब सेनापती यांचे निधन झाले. प्रबोधनकार ठाकरे आपल्या रंगो बापूजी आणि प्रतापसिंह महाराज या पुस्तकात बाळासाहेब सेनापती यांचे निधन आमांशाने म्हणजे अतिसाराने झाले आहे असं मांडले आहे.
२५ मार्च १८४० ला श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे सर्व लवाजम्यासह काशी नगरीत आगमन झाले. ऑक्टोबर १८४५ मध्ये श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी जंगली महाराज उर्फ त्रिंबकजी राजे यांना मेजर कारपेण्टरच्या समक्ष विधीपुर्वक दत्तक घेतले.१० आॕक्टोबर १८४५ च्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी मृत्युपत्रात लिहले की,” माझ्या दोन्ही राण्यांना पुत्र झाला नाही. सबब आमच्या हिंदुधर्माप्रमाणे मी माझे आप्त कै. बळवंतराव राजे भोसले यांचा पुत्र त्रिंबकजी राजेभोसले यास विधीपुर्वक दत्तक घेऊन त्याचे नाव शाहाजी असे ठेवले आहे. सदरहु त्रिंबकजी याच्या मातोश्री गुणवंताबाई हिची या दत्तक विधानाला संमती असुन तीला दुसरा मुलगा दत्तक घेण्याची आम्ही परवानगी दिलेली आहे. माझ्या मागे माझ्या राज्याचा खाजगी आणि सरकारी खजिना नि मालमत्तेचा, माझ्या पदव्यांचा आणि मी उपभोगलेल्या सर्व अधिकारांचा आणि सत्तेचा त्रिंबकजी हा कायदेशिर वारस समजण्यात यावा. विलायतेतल्या मोकादम्याचा निकाल माझ्या हयातीत लागला तर ठिकच. न लागल्यास तो आमचे दत्तकपुत्र शाहाजीराजे यांच्या नावाने पुढे चालवावा आणि ब्रिटीश सरकारने त्यांना न्याय द्यावा.” (मराठी रियासतीमध्ये दत्तकविधानाची तारीख २५ जानेवारी १८४७ आहे. )
त्रिंबकजी राजे यांचेच नाव शहाजी उर्फ शाहू महाराज झाले. या दत्तकविधानानंतर लगेचच गुणवंताबाई साहेब यांनी संताजी राजेभोसले शेडगावकर यांचे कनिष्ठ चिरंजीव तात्याबा यांस दत्तक घेऊन त्याचे नाव दुर्गासिंह ठेवले. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी त्यांना दुर्गासिंह सेनापती असे संबोधले. त्यासोबतच श्रीमंत परशराम राजे भोसले वावीकर यांनी जानराव राजेभोसले शेडगावकर यांचे कनिष्ठ चिरंजीव जिजाबा यांस दत्तक घेतले.
दत्तकविधानानंतर काही दिवसांनी १४ ऑक्टोबर १८४७ ला स्वराज्याचे धनी छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे दुःखद निधन झाले. महाराजांच्या निधनानंतर त्यांची कन्या गोजराबाईसाहेब यशवंतराव गुजर १३ जानेवारी १८५० ला साताऱ्यात आल्या. त्यानंतर अवघ्या तीन वर्षांनी ३० ऑगस्ट १८५३ ला त्यांचे दुःखद निधन झाले.
इसवी सन १८५४ मध्ये श्रीमंत जंगली महाराज, त्यांच्या मातोश्री राजसबाईसाहेब, जनकमता गुणवंताबाई, दुर्गासिंह सेनापती यांचे कृष्णा नदीच्या तीरावर मौजे आरले येथे आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी मातोश्री सगुणाबाईसाहेब आणि व्यंकोजी राजे हे स्वतः आरले येथे जाऊन त्यांना सातारा शहरात घेऊन आले. आणि जुन्या वाड्यात राहू लागले.
इसवी सन १८५७ च्या सुरुवातीलाच इंग्रजांविरुद्ध जनमानसात असंतोष वाढू लागला होता. छत्रपती प्रतापसिंह महाराजांना पदच्युत करून त्यांची काशीला रवानगी केल्याने सातारकर मंडळी जास्त चिडलेली होती. त्यात छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे चिरंजीव छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज साताऱ्यात आल्याने सातारकर मंडळीत उत्साह संचारला होता. छत्रपती प्रतापसिंह महाराजांची बाजू इंग्लंड मध्ये मांडणारे रंगो बापूजी हेही साताऱ्यात दाखल झाले होते. त्यांच्या वाटाघाटी सुरु झाल्या होत्या. इंग्रज अधिकाऱ्यास ठार मारणार असल्याची बातमी साताऱ्यात पसरली. एके दिवशी छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज आणि दुर्गासिंह सेनापती यांचे घोडे रात्रभर जीन घालून वाड्यापुढे सज्ज असल्याचे आढळले. साताऱ्यात इंग्रजांविरुद्ध उठाठेवी वाढू लागल्या होत्या. जुलै महिन्यात इंग्रजांनी धरपकड चालू केली. ८ सप्टेंबर १८५७ ला रंगो मापूजी यांच्या मुलाला पकडून फाशी देण्यात आली. त्यापूर्वीच ६ ऑगस्ट १८५७ ला छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज, त्यांचे चुलते काकासाहेब, मातोश्री राजसबाईसाहेब, जनकमता गुणवंताबाई, दुर्गासिंह सेनापती यांना अटक करून मुंबई येथे बूचर बेटावर अलग अलग ठेवण्यात आले. डिसेंबर १८५७ ला Mr. Rose हे बूचर बेटावर जाऊन त्यांनी महाराजांना कारस्थानाचा कबुली देण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. अर्थात तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज अथवा इतर कुणीही कबुली दिली नाही.
मार्च १८५८ ला त्यांना कराचीला पाठवण्यात आले. त्यांना एकमेकांना भेटूही दिले जात नव्हते. त्यानंतर इतरांना काही काळानंतर सोडण्यात आले. छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज आणि त्यांच्या पत्नी आनंदीबाईसाहेब याना जुलै १८८५ मध्ये सोडण्यात आले. परत आल्यांनतर छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज आपल्या पत्नी समवेत पुण्यातील भवानी पेठेत घर क्र ५४३ येथे राहू लागले. तिथेच त्यांनी १ जून १८९२ ला आपला देह ठेवला. महाराजांनी त्यांच्या हयातीत ब्राम्हो समाजाची दीक्षा घेतली असल्याने त्यांचा अंत्यविधी त्याच पंथानुसार करण्यात आला.
आजही छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज उर्फ जंगली महाराज यांची समाधी पुण्यातील भवानी पेठेत आहे. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे लहान बंधू यांचे देखील नाव श्रीमंत छत्रपती शाहजी महाराज असल्याने गफलत करू नये. दोघांचा कार्यकाळ वेगळा आहे.
आजच्या १८४ व्या जयंतीनिमित्त छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज उर्फ जंगली महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा ...!
फोटो १. राजमाता जिजाऊ माँसाहेब
२. छत्रपती शाहू महाराज
३. छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज उर्फ जंगली महाराज यांच्या भवानी पेठेतील समाधीचा.
४. दत्तकविधानानंतर छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज उर्फ जंगली महाराज आणि त्यांच्यासोबत श्रीमंत दुर्गासिंह सेनापती
© श्रीमंत खेळोजी विठोजी राजे भोसले प्रतिष्ठान, वावी

हिन्दुस्तान के इतिहास के बाजीराव

 हिन्दुस्तान के इतिहास के बाजीराव


हिन्दुस्तान के इतिहास के बाजीराव अकेला ऐसा योद्धा था जिसने 41 लड़ाइयां लड़ीं और एक भी नहीं हारीं। वर्ल्ड वॉर सेकंड में ब्रिटिश आर्मी के कमांडर रहे मशहूर सेनापति जनरल मांटगोमरी ने भी अपनी किताब 'हिस्ट्री ऑफ वॉरफेयर' में बाजीराव की बिजली की गति से तेज आक्रमण शैली की जमकर तारीफ की है और लिखा है कि बाजीराव कभी हारा नहीं
दिल्ली पर आक्रमण :
उन्होंने 12 नवंबर 1736 को पुणे से दिल्ली मार्च शुरू किया। मुगल बादशाह ने आगरा के गवर्नर सादात खां को उनसे निपटने का जिम्मा सौंपा। मल्हारराव होलकर और पिलाजी जाधव की सेनाएं यमुना पार कर के दोआब में आ गईं। मराठों से खौफ में था सादात खां, उसने डेढ़ लाख की सेना जुटा ली। मराठों के पास तो कभी भी एक मोर्चे पर इतनी सेना नहीं रही थी। लेकिन उनकी रणनीति के चलते मल्हारराव होलकर ने रणनीति अनुसार मैदान छोड़ दिया। सादात खां ने इसे मराठों का डरना समझा और उसने डींगें मारते हुए अपनी जीत का सारा विवरण मुगल बादशाह को पहुंचा दिया और खुद सेना लेकर मथुरा की तरफ चला गया।
बाजीराव ने तालकटोरा में अपनी सेना का कैंप डाल दिया, केवल 500 घोड़े थे उसके पास। मुगल बादशाह मोहम्मद शाह रंगीला बाजीराव को लाल किले के इतना करीब देखकर घबरा गया। उसने खुद को लाल किले के अंदर सुरक्षित इलाके में कैद कर लिया और मीर हसन कोका की अगुआई में 8 से 10 हजार सैनिकों की टोली बाजीराव से निपटने के लिए भेजी। बाजीराव के 500 लड़ाकों ने उस सेना को बुरी तरह शिकस्त दी। ये 28 मार्च 1737 का दिन था, मराठा ताकत के लिए सबसे बड़ा दिन।
कितना आसान था बाजीराव के लिए लाल किले में घुसकर दिल्ली पर कब्जा कर लेना। लेकिन बाजीराव की जान तो पुणे में बसती थी, महाराष्ट्र में बसती थी। वो 3 दिन तक वहीं रुका। एक बार तो मुगल बादशाह ने योजना बना ली थी कि लाल किले के गुप्त रास्ते से भागकर अवध चला जाए लेकिन बाजीराव बस मुगलों को अपनी ताकत का अहसास दिलाना चाहता था।
पोस्ट कर्ता- दीपिका पंवार

Wednesday, 20 December 2023

पतोडी नवाब ..

 



पतोडी नवाब ...
15 व्या शतकात लोधी वंश चे राज्य होते ...सिंधू नदी च्या पलीकडे अफगाणिस्तान च्या कबिला मध्ये अनेक अफगाणी लोक राहत जे गरीब होते शिकार करून जगत ..दरोडा आणि छोट्या छोट्या राजांच्या लढाई मध्ये पैसे घेऊन लढाई करत ..दिसायला उंच शरीराने बलाढ्य ..लढाई मध्ये तरबेज असणे हे यांचं वैशिष्ट्य...भारतात अनेक राजे यांना पैसे देऊन लढाई मध्ये बोलवत ..असेच एक अफगाणी सरदार #सलामत_अली_खान अफगाणिस्तान मधील #भडाच भागातील ..याला पहिल्यांदा बहलोल लोधी ने मेवाड मधील भाग जिंकण्याससाठी बोलावले होते ..
दिल्लीमधील सत्ता पालट झाली आणि 16 व्या शतकाच्या सुरुवातीला बाबरने राजगादी घेतली ..आतापर्यंत लोधी कडे सैन्यात काम करणारा सलामत अली खान आणि त्याच्या बाकी परिवारातील लोक बाबरच्या सैन्यात गेला ..आणि मोघलांच्या दरबारात काम केले ..सलामत अली खान चा मुलगा अर्फ खान ने मोघलांच्या दरबारात इतके पक्के स्थान निर्माण केले की वेगवेगळ्या हुद्यावर नेमले ..पण 18 व्या शतकात औरंगजेब मेल्यानंतर मोघल साम्राज्य तुटायला लागले ...त्यामुळे यांच्या कडे काम राहिले नाही ..त्यांनतर यांनी अफगाणिस्तान मधून अजून नातेवाईक आणि लोक बोलावून स्वतःची सैन्य निर्माण करून पैसे घेऊन भारतातील अनेक राजांकडे लढाई करणे हे आपले जुने काम चालू केले ..
18 व्या शतकाच्या शेवटी दिल्ली मध्ये मोघल संपत होते त्यावेळी #मोघल_बादशाह_शाह_आलम दुसरा हा गादीवर होता ..आणि सलामत अली खान च्या पिढीतील #फैज_तलब_खान सेवेसाठी होता ..याच वेळी अहमद शाह अब्दाली आणि रोहिला हे आणि अनेक लोक दिल्लीवर आक्रमण करत ..म्हणून शाह आलम ने त्यावेळचे सगळ्यात शक्तिशाली असलेले #मराठा_सरदार #महादजीराव_शिंदे हे उत्तरेत काम करत यांची मदत घेतली ..1770 पासून 1780 पर्यंत पतोडी, दिल्ली गुडगाव हे सगळं शिंदे यांच्या ताब्यात होते ..मोघल राजे मांडलिक म्हणून काम बघत ..तेव्हा महादजी शिंदे यांच्या मुलाकडे #दौलतराव_शिंदे यांच्या कडे कामाला राहिला ..हाच तो काळ ज्या काळात पूर्ण दिल्ली मराठा साम्राज्याच्या अधीन होती ..
पण याच वेळी दिल्लीवर नजर होती ती इंग्रजांची..1775 ते 1782 मध्ये इंग्रज आणि मराठा यांच्या युद्ध झाले होते आणि ही युद्ध मराठ्यांनी जिंकली होती पण फैज तलब खान आणि काही अफगाणी सैनिक अचानक इंग्रजांच्या बाजूने लढले पैसे घेऊन ..अश्या प्रकारे मराठ्यांना धोका दिला मराठ्यांचे अनेक सैनिकी महत्त्व पूर्ण माहिती इंग्रजांना दिली ..त्याकाळी होळकर आणि भरतपूर चे राजा यांना सुद्धा अश्या प्रकारे हरवल ..
इंग्रजांनी गद्दारीचे बक्षीस म्हणून फैज अली खान ला पतोडी दिले 1804 मोहम्मद फैज अली खान सिद्दिकी हा पहिला नवाब घोषित केला गेला ..त्यांनतर इंग्रजांना अनेक राज्य मिळवण्यासाठी मदत केली..
पण 1857 च्या उठवानंतर उत्तरेत इंग्रजांच्या विरोधात क्रांतिकारक यांचे आवाज वाढू लागले ..अश्याच काही क्रांतिकारक लोकांनी गुडगाव मध्ये एका इंग्रज अधिकाऱ्याला घेरले आणि ताब्यात घेतले होते पण त्याच वेळी फैज अली खान चा दुसरा नवाब #अकबरअलीखान ने या क्रांतिकारक लोकांवर हमला केला आणि इंग्रज अधिकारी सुटला यानंतर पतोडी वर क्रांतिकारक लोकांनी हमला केला पण त्यांच्या कडे इंग्रजांनी दिलेले आधुनिक हत्यार असल्याने शेकडो क्रांतिकारक मारले गेले ..यासाठी पतोडी नवाब ला बक्षीस दिले गेले .
पतोडी च्या थोड्या अंतरावर झुझ्झर हे छोटे राज्य (रियासत)होते.. जे पतोडी च्या नवाब चे सासर होते ..तिथला राजा #अब्दुल_हमीन खान बायकोचा भाऊ हा क्रांतिकारक लोकांना मदत करतो म्हणून पकडून दिला गेला इंग्रजांनी त्याला फाशी दिली ..त्यांनतर इंग्रजांना भारतावर राज्य करणे सोपं गेलं फोडा आणि राज्य करा त्यामुळे कोणत्याही मदतीची गरज राहिली नाही पूर्ण देश इंग्रजांच्या ताब्यात होता ..
यानंतर बऱ्याच पिढीने पतोडी वर राज्य केले ..1917 मध्ये #इफतिकार_अली_खान ..अवघ्या 7 व्या वर्षी वडिलांचे निधन झाल्यामुळे राजगादी मिळाली पण आईने कारभार बघितला आणि यांना लंडन ला शिकण्यासाठी पाठवले.. तिथं इंग्लंड च्या टीम मध्ये क्रिकेट खेळल ..1932 मध्ये क्रिकेटर ऑफ द इअर चा खिताब दिला गेला .
1946 मध्ये भारतीय टीम मधून खेळले यांचे लग्न भोपाळ चे नवाब #हमीदउल्ला_खान ची मुलगी #साजीदा_सुलतान यांच्या बरोबर झाले त्यावेळी भोपाळ श्रीमंत राजघराणे होते ..आपल्या मुलीला कोणताही त्रास नको म्हणून रॉबर्ट टॉर्र वसेल हा प्रसिद्ध इंग्रज आर्किटेक्ट याला मोठा महाल बांधायला सांगितला (ज्याने देशातील अनेक इंग्रजांच्या इमारती बांधल्या होत्या )..पतोडी मध्ये 150 खोल्यांचा महाल बांधला गेला ..इथं त्यांना 3 मुली आणि एक मुलगा झाला ..
पण 1947 देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी बरेच नवाब पाकिस्तान मध्ये जाण्यासाठी आग्रही होते यात हमीदउल्ला खान भोपाळ सहित जोधपूर आणि अर्धे राजस्थान पाकिस्तान मध्ये जावे म्हणून प्रयत्न करत होते ..पतोडी नवाब ला काही ऑप्शन नव्हता छोटे राज्य आणि आजूबाजूच्या सगळ्यांनी भारतात आपले राज्य विलीन करायचे ठरवले ..हमिदउल्ला खान आपल्या तीन मुलींना घेऊन पाकिस्तान मध्ये निघून गेल्या मुळे इथली सगळी प्रॉपर्टी पतोडी च्या बायकोला म्हणजे साजीदा सुलतान ला मिळाली ..पण काही दिवसांनी पोलो खेळताना इफतेकर अली खान चा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला ..साजिद सुलतान पार्लमेंट मध्ये सभासद झाली ..
त्यानंतर पतोडी चा नवाब झाला #मन्सूर_अली_खान ..याने सुद्धा भारतीय टीम मध्ये क्रिकेट खेळले .1968 मध्ये #शर्मिला_टागोर यांच्याशी लग्न केले यांना 3 मुलं झाली ..2 मुली आणि एक मुलगा सैफ अली खान ..
पुढच्या इतिहास आपल्याला माहिती आहेच ..सैफ अली खान हा 10 वा नवाब आहे पतोडी राज्याच्या ...
पण यांचा इतिहास नेहमीच भारतीय लोकांच्या विरोधात होता आणि स्वार्थी होता ..आजही यांच्या मुलांची नाव तैमुर आणि जहांगीर अशी आहेत ..यात आपल्याला नवल वाटायला नको ...आजीच्या भोपाळ च्या प्रॉपर्टी ची केस एनिमी ऍक्ट नुसार आजही चालू आहे ..एकतर ती संपत्ती सरकार जमा होऊ शकते किंवा ही केस वर्षोनुवर्षे चालतच राहील ..

Monday, 18 December 2023

शहाजानचा विद्रोह ते राज्याभिषेक ते हाडा चौहाणांचे दोन रियासत मध्ये विभाजन .

 


शहाजानचा विद्रोह ते राज्याभिषेक ते हाडा चौहाणांचे दोन रियासत मध्ये विभाजन .
राजा भोजराज हाडा चौहाण यांना समकालीन मुघल शासक अकबर बादशाह .
राजा भोजराज यांना दोन पुत्र थोरले 1)रतनसिंह व धाकटे 2)हद्यनारायण हे दोन्ही पुत्र मुघलशासक अकबराचा पुत्र जहाँगीर बादशाह चे समकालीन .रतनसिंह हाडा हे बुंदीच्या गादीवर आले असता त्यांचा धाकटा भाऊ हा कोटा चा कारभार संभाळत कोटा त्यावेळि बुंदीमधुन विभक्त नव्हता व कोट्याला अधिकारही नव्हते जेव्हा बुंदीवरून आदेश येईल तेव्हा कोटा सज्ज होईल असा अंतर्गत करार होता .पुढे रतनसिंह यांना दोन मुले थोरला मुलगा 1)हरिसिंह हाडा चौहाण व धाकटा मुलगा2)माधोसिंह हाडा चौहाण .
हाडा रतनसिंह व मुघल शासक जहाँगीर दोघांचि घनिष्ठ मैत्री होती ज्यावेळी इ.स 1622 ला खुर्रम ने विद्रोह केला तेव्हा जहाँगीर ने तो मोडुन काढला व खुर्रम ला नजर कैदैत ठेवण्यासाठि हाडा रतनसिंह यांच्या कडे सोपावले .रतनसिंह यांनी ती जवाबदारी आपला थोरला मुलगा हरीसिंह याजकडे दिली पण हरिसिंह व खुर्रम यांच्यात कधिच पटत नव्हते हरीसिंहाने खुर्रमला खुप त्रास दिला ; कित्येक वेळा हरिसिंह खुर्रमला मारतही असे . एकदा खुर्रम ने राजा रतनसिंह हाडा यांना हा वृत्तांत सांगितला तेव्हा रतनसिंहाने आपला धाकटा मुलगा माधोसिंह यांस खुर्रम ची जवाबदारी दिली तेव्हा माधोसिंह याने उत्तम प्रकारे त्याची जवाबदारी घेतली त्यास मित्र करून घेतला आणि त्याच्या सर्व इच्छा नजरकैदैत पुर्ण केल्या तेव्हा खुर्रम ने कुराण वर शपथ घेऊन माधोसिंह हाडा चौहाण यांना शब्द दिला कि जेव्हा मी बादशाह बनेल तेव्हा उपकाराला स्मरूण मी त्याची परत फेड करेल .
पुढे 1628 ई मध्ये खुर्रम उर्फ शहाजान चा राज्याभिषेक आग्रा येथे झाला त्यावेळी त्याने ’’अबुल मुजफ्फर शहाबुद्दीन मुहम्मद शाहिब किस ए सानी’’ ची उपाधि धारण केली. शहाजान संधीची वाट पाहत होता रतनसिंह यांनी कोट्याची जवाबदारी माधोसिंह हाडाकडे बुंदीच्या आधीन राहुन दिली होती पण शहाजानच्या राज्याभिषेकानंतर त्याने बुंदीच्या हरीसिंहाचा बदला घेण्यासाठी व कोटाच्या माधोसिंह हाडाचा उपकार फेडण्यासाठि दोघांत भांडण लावुन दिले व माधोसिंह हाडा याला कोटा रियासत चा स्वंतत्र राजा घोषित केले .अशा प्रकारे हाडा चौहाणांचे बुंदी व कोटा दोन भागात विभाजन झाले.

हिराबाई पेडणेकर:

  हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली "पुरुषानेही स्त्रीवर...