Wednesday, 20 December 2023

पतोडी नवाब ..

 



पतोडी नवाब ...
15 व्या शतकात लोधी वंश चे राज्य होते ...सिंधू नदी च्या पलीकडे अफगाणिस्तान च्या कबिला मध्ये अनेक अफगाणी लोक राहत जे गरीब होते शिकार करून जगत ..दरोडा आणि छोट्या छोट्या राजांच्या लढाई मध्ये पैसे घेऊन लढाई करत ..दिसायला उंच शरीराने बलाढ्य ..लढाई मध्ये तरबेज असणे हे यांचं वैशिष्ट्य...भारतात अनेक राजे यांना पैसे देऊन लढाई मध्ये बोलवत ..असेच एक अफगाणी सरदार #सलामत_अली_खान अफगाणिस्तान मधील #भडाच भागातील ..याला पहिल्यांदा बहलोल लोधी ने मेवाड मधील भाग जिंकण्याससाठी बोलावले होते ..
दिल्लीमधील सत्ता पालट झाली आणि 16 व्या शतकाच्या सुरुवातीला बाबरने राजगादी घेतली ..आतापर्यंत लोधी कडे सैन्यात काम करणारा सलामत अली खान आणि त्याच्या बाकी परिवारातील लोक बाबरच्या सैन्यात गेला ..आणि मोघलांच्या दरबारात काम केले ..सलामत अली खान चा मुलगा अर्फ खान ने मोघलांच्या दरबारात इतके पक्के स्थान निर्माण केले की वेगवेगळ्या हुद्यावर नेमले ..पण 18 व्या शतकात औरंगजेब मेल्यानंतर मोघल साम्राज्य तुटायला लागले ...त्यामुळे यांच्या कडे काम राहिले नाही ..त्यांनतर यांनी अफगाणिस्तान मधून अजून नातेवाईक आणि लोक बोलावून स्वतःची सैन्य निर्माण करून पैसे घेऊन भारतातील अनेक राजांकडे लढाई करणे हे आपले जुने काम चालू केले ..
18 व्या शतकाच्या शेवटी दिल्ली मध्ये मोघल संपत होते त्यावेळी #मोघल_बादशाह_शाह_आलम दुसरा हा गादीवर होता ..आणि सलामत अली खान च्या पिढीतील #फैज_तलब_खान सेवेसाठी होता ..याच वेळी अहमद शाह अब्दाली आणि रोहिला हे आणि अनेक लोक दिल्लीवर आक्रमण करत ..म्हणून शाह आलम ने त्यावेळचे सगळ्यात शक्तिशाली असलेले #मराठा_सरदार #महादजीराव_शिंदे हे उत्तरेत काम करत यांची मदत घेतली ..1770 पासून 1780 पर्यंत पतोडी, दिल्ली गुडगाव हे सगळं शिंदे यांच्या ताब्यात होते ..मोघल राजे मांडलिक म्हणून काम बघत ..तेव्हा महादजी शिंदे यांच्या मुलाकडे #दौलतराव_शिंदे यांच्या कडे कामाला राहिला ..हाच तो काळ ज्या काळात पूर्ण दिल्ली मराठा साम्राज्याच्या अधीन होती ..
पण याच वेळी दिल्लीवर नजर होती ती इंग्रजांची..1775 ते 1782 मध्ये इंग्रज आणि मराठा यांच्या युद्ध झाले होते आणि ही युद्ध मराठ्यांनी जिंकली होती पण फैज तलब खान आणि काही अफगाणी सैनिक अचानक इंग्रजांच्या बाजूने लढले पैसे घेऊन ..अश्या प्रकारे मराठ्यांना धोका दिला मराठ्यांचे अनेक सैनिकी महत्त्व पूर्ण माहिती इंग्रजांना दिली ..त्याकाळी होळकर आणि भरतपूर चे राजा यांना सुद्धा अश्या प्रकारे हरवल ..
इंग्रजांनी गद्दारीचे बक्षीस म्हणून फैज अली खान ला पतोडी दिले 1804 मोहम्मद फैज अली खान सिद्दिकी हा पहिला नवाब घोषित केला गेला ..त्यांनतर इंग्रजांना अनेक राज्य मिळवण्यासाठी मदत केली..
पण 1857 च्या उठवानंतर उत्तरेत इंग्रजांच्या विरोधात क्रांतिकारक यांचे आवाज वाढू लागले ..अश्याच काही क्रांतिकारक लोकांनी गुडगाव मध्ये एका इंग्रज अधिकाऱ्याला घेरले आणि ताब्यात घेतले होते पण त्याच वेळी फैज अली खान चा दुसरा नवाब #अकबरअलीखान ने या क्रांतिकारक लोकांवर हमला केला आणि इंग्रज अधिकारी सुटला यानंतर पतोडी वर क्रांतिकारक लोकांनी हमला केला पण त्यांच्या कडे इंग्रजांनी दिलेले आधुनिक हत्यार असल्याने शेकडो क्रांतिकारक मारले गेले ..यासाठी पतोडी नवाब ला बक्षीस दिले गेले .
पतोडी च्या थोड्या अंतरावर झुझ्झर हे छोटे राज्य (रियासत)होते.. जे पतोडी च्या नवाब चे सासर होते ..तिथला राजा #अब्दुल_हमीन खान बायकोचा भाऊ हा क्रांतिकारक लोकांना मदत करतो म्हणून पकडून दिला गेला इंग्रजांनी त्याला फाशी दिली ..त्यांनतर इंग्रजांना भारतावर राज्य करणे सोपं गेलं फोडा आणि राज्य करा त्यामुळे कोणत्याही मदतीची गरज राहिली नाही पूर्ण देश इंग्रजांच्या ताब्यात होता ..
यानंतर बऱ्याच पिढीने पतोडी वर राज्य केले ..1917 मध्ये #इफतिकार_अली_खान ..अवघ्या 7 व्या वर्षी वडिलांचे निधन झाल्यामुळे राजगादी मिळाली पण आईने कारभार बघितला आणि यांना लंडन ला शिकण्यासाठी पाठवले.. तिथं इंग्लंड च्या टीम मध्ये क्रिकेट खेळल ..1932 मध्ये क्रिकेटर ऑफ द इअर चा खिताब दिला गेला .
1946 मध्ये भारतीय टीम मधून खेळले यांचे लग्न भोपाळ चे नवाब #हमीदउल्ला_खान ची मुलगी #साजीदा_सुलतान यांच्या बरोबर झाले त्यावेळी भोपाळ श्रीमंत राजघराणे होते ..आपल्या मुलीला कोणताही त्रास नको म्हणून रॉबर्ट टॉर्र वसेल हा प्रसिद्ध इंग्रज आर्किटेक्ट याला मोठा महाल बांधायला सांगितला (ज्याने देशातील अनेक इंग्रजांच्या इमारती बांधल्या होत्या )..पतोडी मध्ये 150 खोल्यांचा महाल बांधला गेला ..इथं त्यांना 3 मुली आणि एक मुलगा झाला ..
पण 1947 देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी बरेच नवाब पाकिस्तान मध्ये जाण्यासाठी आग्रही होते यात हमीदउल्ला खान भोपाळ सहित जोधपूर आणि अर्धे राजस्थान पाकिस्तान मध्ये जावे म्हणून प्रयत्न करत होते ..पतोडी नवाब ला काही ऑप्शन नव्हता छोटे राज्य आणि आजूबाजूच्या सगळ्यांनी भारतात आपले राज्य विलीन करायचे ठरवले ..हमिदउल्ला खान आपल्या तीन मुलींना घेऊन पाकिस्तान मध्ये निघून गेल्या मुळे इथली सगळी प्रॉपर्टी पतोडी च्या बायकोला म्हणजे साजीदा सुलतान ला मिळाली ..पण काही दिवसांनी पोलो खेळताना इफतेकर अली खान चा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला ..साजिद सुलतान पार्लमेंट मध्ये सभासद झाली ..
त्यानंतर पतोडी चा नवाब झाला #मन्सूर_अली_खान ..याने सुद्धा भारतीय टीम मध्ये क्रिकेट खेळले .1968 मध्ये #शर्मिला_टागोर यांच्याशी लग्न केले यांना 3 मुलं झाली ..2 मुली आणि एक मुलगा सैफ अली खान ..
पुढच्या इतिहास आपल्याला माहिती आहेच ..सैफ अली खान हा 10 वा नवाब आहे पतोडी राज्याच्या ...
पण यांचा इतिहास नेहमीच भारतीय लोकांच्या विरोधात होता आणि स्वार्थी होता ..आजही यांच्या मुलांची नाव तैमुर आणि जहांगीर अशी आहेत ..यात आपल्याला नवल वाटायला नको ...आजीच्या भोपाळ च्या प्रॉपर्टी ची केस एनिमी ऍक्ट नुसार आजही चालू आहे ..एकतर ती संपत्ती सरकार जमा होऊ शकते किंवा ही केस वर्षोनुवर्षे चालतच राहील ..

Monday, 18 December 2023

शहाजानचा विद्रोह ते राज्याभिषेक ते हाडा चौहाणांचे दोन रियासत मध्ये विभाजन .

 


शहाजानचा विद्रोह ते राज्याभिषेक ते हाडा चौहाणांचे दोन रियासत मध्ये विभाजन .
राजा भोजराज हाडा चौहाण यांना समकालीन मुघल शासक अकबर बादशाह .
राजा भोजराज यांना दोन पुत्र थोरले 1)रतनसिंह व धाकटे 2)हद्यनारायण हे दोन्ही पुत्र मुघलशासक अकबराचा पुत्र जहाँगीर बादशाह चे समकालीन .रतनसिंह हाडा हे बुंदीच्या गादीवर आले असता त्यांचा धाकटा भाऊ हा कोटा चा कारभार संभाळत कोटा त्यावेळि बुंदीमधुन विभक्त नव्हता व कोट्याला अधिकारही नव्हते जेव्हा बुंदीवरून आदेश येईल तेव्हा कोटा सज्ज होईल असा अंतर्गत करार होता .पुढे रतनसिंह यांना दोन मुले थोरला मुलगा 1)हरिसिंह हाडा चौहाण व धाकटा मुलगा2)माधोसिंह हाडा चौहाण .
हाडा रतनसिंह व मुघल शासक जहाँगीर दोघांचि घनिष्ठ मैत्री होती ज्यावेळी इ.स 1622 ला खुर्रम ने विद्रोह केला तेव्हा जहाँगीर ने तो मोडुन काढला व खुर्रम ला नजर कैदैत ठेवण्यासाठि हाडा रतनसिंह यांच्या कडे सोपावले .रतनसिंह यांनी ती जवाबदारी आपला थोरला मुलगा हरीसिंह याजकडे दिली पण हरिसिंह व खुर्रम यांच्यात कधिच पटत नव्हते हरीसिंहाने खुर्रमला खुप त्रास दिला ; कित्येक वेळा हरिसिंह खुर्रमला मारतही असे . एकदा खुर्रम ने राजा रतनसिंह हाडा यांना हा वृत्तांत सांगितला तेव्हा रतनसिंहाने आपला धाकटा मुलगा माधोसिंह यांस खुर्रम ची जवाबदारी दिली तेव्हा माधोसिंह याने उत्तम प्रकारे त्याची जवाबदारी घेतली त्यास मित्र करून घेतला आणि त्याच्या सर्व इच्छा नजरकैदैत पुर्ण केल्या तेव्हा खुर्रम ने कुराण वर शपथ घेऊन माधोसिंह हाडा चौहाण यांना शब्द दिला कि जेव्हा मी बादशाह बनेल तेव्हा उपकाराला स्मरूण मी त्याची परत फेड करेल .
पुढे 1628 ई मध्ये खुर्रम उर्फ शहाजान चा राज्याभिषेक आग्रा येथे झाला त्यावेळी त्याने ’’अबुल मुजफ्फर शहाबुद्दीन मुहम्मद शाहिब किस ए सानी’’ ची उपाधि धारण केली. शहाजान संधीची वाट पाहत होता रतनसिंह यांनी कोट्याची जवाबदारी माधोसिंह हाडाकडे बुंदीच्या आधीन राहुन दिली होती पण शहाजानच्या राज्याभिषेकानंतर त्याने बुंदीच्या हरीसिंहाचा बदला घेण्यासाठी व कोटाच्या माधोसिंह हाडाचा उपकार फेडण्यासाठि दोघांत भांडण लावुन दिले व माधोसिंह हाडा याला कोटा रियासत चा स्वंतत्र राजा घोषित केले .अशा प्रकारे हाडा चौहाणांचे बुंदी व कोटा दोन भागात विभाजन झाले.

Thursday, 14 December 2023

वीर सरदार मानाजी पायगुडे:-

 


वीर सरदार मानाजी पायगुडे:-
झेंडा ‘अटके’पार!
पानिपतच्या रणांगणावर अगणित मराठी वीरांनी आपले प्राण देशासाठी अर्पण केले आहेत. यामध्ये
पुणे परिसरातील मावळ्यांच्या शौर्याला तोड नाही. पानिपत संग्रामपूर्वी १७५८ च्या ऑगस्ट महिन्यात आताच्या पाकिस्तानात असलेला ‘अटक’ चा किल्ला मराठय़ांनी जिंकला. या विजयात पानिपतवीर मानाजी पायगुडे आघाडीवर होते.
सन १७५८ मध्ये मराठय़ांनी सरहिंद, लाहोर जिंकले. अहमदशहा अब्दालीचा मुलगा तैमूर आणि सरदार जहाँनखान यांनी लाहोर सोडून पळ काढला. जाताना त्यांनी अवजड तोफखाना आणि दिल्लीतील लुटीचा खजिना तेथेच सोडून दिला. त्या वेळी तैमूरने आपला गुलाम तहमासखान यास गुलामगिरीतून मुक्त केले. तहमासखान मुक्त झाल्याने त्याने लाहोरच्या वेशीचे दरवाजे उघडले. लाहोरमध्ये पहिले पाऊल टाकणारे वीर होते मानाजी पायगुडे! तारीख होती १० एप्रिल १७५८. ही हकिकत ‘तहमासनामा’ या आपल्या आत्मचरित्रापर ग्रंथात तहमासखानाने लिहून ठेवली आहे. अब्दालीच्या सैन्याचा पाठलाग मराठय़ांनी चालूच ठेवला होता. त्यांनी चिनाब, झेलम अशा मोठय़ा नद्या ओलांडल्या. रावळपिंडीही मराठय़ांनी सर केली व मराठी फौजा सिंधु नदीच्या काठांवर आल्या. नदीच्या पलीकडील काठांवर अटक किल्ला आहे. वायव्य सरहद्दीचे रक्षण करण्यासाठी १५८१ मध्ये अकबराने अटक किल्ला बांधला. मराठी सैन्याने नदीच्या वेगवान प्रवाहाचा अंदाज घेतला व नदीवर होडीचा पूल तयार केला. होडीच्या पुलावरून मराठी फौजा सिंधूपार होऊन अटक किल्ल्यापर्यंत आल्या व किल्ल्यावर हल्ला करून तो हस्तगत केला. ‘अटके’ वर मराठी जरीपटका फडकला. ही गोष्ट १० ऑगस्ट १७५८ ची. मराठी फौजेत या वेळी मानाजी पायगुडे, गंगाधर बाजीराव रेठरेकर, गोपाळराव गणेश, तुकोजी खंडोजी कदम, नरसोजी पंडित, साबाजी शिंदे इत्यादी सेनानी आपापल्या पथकाबरोबर होते.
अटकेच्या मोहिमेचे नेतृत्व श्रीमंत रघुनाथराव पेशवे यांनी केले. लाहोरहून श्रीमंत रघुनाथरावांचे पत्र पुण्यात आले. बिपाशा नदी तीरावरून सडय़ा फौजा मानाजी पायगुडे, गंगाधर बाजीराव, गोपाळ गणेशसह पुढे रवाना केल्या. पेशवे दप्तर खंड २७/२१८ या मध्ये या बाबतचे पत्र उपलब्ध आहे. ‘अटके’ च्या विजयात सहभागी असलेले सरदार मानाजी पायगुडे यांची इतिहासातील कामगिरी खालील प्रसंगावरून आपल्या समोर येते.
१) सन १७३४ मधील दिल्लीच्या रणसंग्रामात राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, यशवंतराव पवार, गोविंद हरी पटवर्धन इत्यादी ज्येष्ठांबरोबर मानाजी पायगुडे सहभागी होते.
२) १६-२-१७५१ च्या पत्रात नारायणराव घोरपडे व मानाजी पायगुडे यांनी बेळगाव प्रश्नंतात शहापूरची पेठ मारली असा उल्लेख आहे. ३) ३०-११-१७३७ च्या पत्रात म्हटल्याप्रमाणे थोरले बाजीराव यांनी काही घोडे व बंदूकस्वार मानाजींकडे सुपूर्द केले होते. ४) २६-१-१७४८ च्या पत्रात जनार्दन गणेश भाऊसाहेब पेशव्यांना लिहितात, ‘मानाजी पायगुडे व आंग्रे यांची लढाई मसुऱ्यास झाली. आंग्रे भगवंतगडावर पळून गेले. मानाजी पायगुडे यांनी पारगड व शिवगड हस्तगत केला व पोर्तुगीजांना शह दिला.’ ५) २२-१-१७४९ च्या पत्रात विठ्ठल शिवदेव पेशव्यांना आपली हकिकत कळवितात. त्यात मानाजी व त्यांचा पुत्र लालजी यांच्या पराक्रमाचा उल्लेख आहे. बुंदेलखंडात तेजगड किल्ला आहे. ह्य़ा किल्ल्यास तीन हजार सैन्याने वेढा घालून किल्ला मोठय़ा शर्थीने जिंकला. मानाजी व त्यांचा पुत्र लालजी याने पराक्रमाची परिसीमा गाठली. लालजीस वीरमरण आले परंतु किल्लय़ाचा पाडाव झाला. ६) फेब्रुवारी १७५१ च्या पत्रात त्रिंबकराव पेठे सातारा व कोल्हापूर प्रश्नंताची घटना पेशव्यांना कळवतात. त्यात म्हटले आहे, की ‘मानाजी पायगुडे कोल्हापूर प्रश्नंतात तळ ठोकून आहेत व छत्रपती रामराजे कोल्हापूरकर राजकारणावर लक्ष ठेवून आहेत.’ ७) १७५४ च्या पत्रात विठ्ठल शिवदेव लिहितात- राजेश्री मानाजी पायगुडे यांजकडे बाणाची कैची, बाणदार, पैसा सत्वर पाठवायची आज्ञा करावी. ८) १४-२-५६ (१७५६) च्या पत्रात गोविंद बल्लाळ यांनी बकरुल्लाखान याचे बरोबर केलेल्या लढाईचे वर्णन आहे. यातही मानाजींनी मोठा पराक्रम गाजवला. ९) जून १७५७ रोजी मानाजी पायगुडे यांनी दिल्लीहून पुण्यास कळवले आहे, की आम्ही लाल किल्ल्याचा काबूल दरवाजा व लाहोर दरवाजा ताब्यात घेतला आहे व त्यावर पहारे बसवले आहेत. आम्हाला मनुष्यबळ व पैसा पाठवावा, ही विनंती. पानिपत संबंधात मानाजी पायगुडे यांचा बऱ्याच पत्रात उल्लेख आहे. पानिपतच्या ऐतिहासिक पोवाडय़ात समशेरबहाद्दर व मानाजी शेजारीशेजारी उभे राहून लढत होते असा उल्लेख आहे.
कॅ. वासुदेव बेलवलकर यांनी लिहिले आहे, की खैबरखिंडीच्या पायथ्याशी असलेल्या जमरुड या किल्ल्यावर मानाजी पायगुडे, साबाजी शिंदे, तुकोजी होळकर, केशवराव पानसे इत्यादींनी कबजा मिळविला. मराठी फौजा जवळजवळ काबूल नदीपर्यंत गेल्या होत्या, पलीकडून येणाऱ्या शत्रूच्या फौजांना हैराण करण्याचे काम या मराठी फौजेने केले. मानाजी पायगुडे यांची एकंदर कारकीर्द पाहता असे लक्षात येते, की मानाजी हे पेशव्यांचे अत्यंत विश्वासू सरदार होते. त्यांचे आयुष्यातील आणखी एक प्रसंग म्हणजे त्यांच्या अपूर्व कामगिरीचा ‘कळस’ म्हणावा लागेल. पेशवे-पोर्तुगीज संबंधातील एक घटना. त्या वेळी गोव्यात मांडवीनदी काठावर मराठा पोर्तुगीज यांच्यात बोलणी चालू होती. नदीकाठी एका तंबूत दोन मराठा सरदार मराठय़ांचे वतीने बोलत होते. नारायण शेणवी नावाचा ब्राह्मण दुभाष्याचे काम करीत होता. मराठय़ांचे वकील म्हणून काम करणारे दोन सरदार होते. मानाजी पायगुडे व सयाजी गुजर! ही बाब सेतु माधवराव पगडी यांनी आपल्या ‘मराठे-पोर्तुगीज संबंध’ या आपल्या पुस्तकात दिलेली आहे. अशा या मानाजी पायगुडे व अन्य सर्वच मराठा सेनानींना मानाचा मुजरा
साभार- १० ऑगस्ट २००९ लोकसत्ता वृत्त

श्रीमंत सरदार यशवंतराव आनंदराव पवार

 


श्रीमंत सरदार यशवंतराव आनंदराव पवार
( पानिपतच्या लढाईत मर्दुमकी गाजवणारे रणमर्द सरदार )
" धार" संस्थानचे दुसरे मराठा पवार राजे ...! ( इ . स. १७३५ ते १७६१ )
वडील आनंदराव सर्पदंशाने मरण पावले (१७३६). त्यांचा सरंजाम मुलगा यशवंतराव याजकडे आला. बाजीरावाच्या दिल्लीवरील स्वारीत तुकोजी, जिवाजी व यशवंतराव यांनी त्याजकडे सोपविलेली कामे उत्तम रीतीने पार पाडली. वसईच्या रणसंग्रामातही त्यांनी भाग घेतला होता. १७५२ मध्ये दिल्लीच्या बादशाहाशी मराठ्यांचा जो प्रसिद्ध अहदनामा (काररनामा) झाला, तो पेशव्यांतर्फे पाळला जाईल याची हमी शिंदे, होळकर व पवार या तिघांनी घेतली होती. यशवंतराव पानिपतच्या तिसऱ्‍या लढाईत मराठ्यांच्या बाजूने लढताना कामी आले (१७६१).
माळवा भागातील मराठ्यांचा अंमल पक्का करण्यात आणि पेशव्यांच्या मोहिमांत वेळोवेळी सामिल होउन मराठ्यांचा शत्रुचा मोड करण्यात यशवंतरावानी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली .
कर्तबगार व करारी स्वभावाचे यशवंतराव पवार आपल्या कारकिर्दीत मराठा सत्तेचे प्रमुख आधारस्तंभ बनुन राहीले .
शाहू छत्रपतींचे अगदी मर्जीतले सरदार म्हणून पवारांचे नाव घेतले जाते.
अशा कर्तबगार सेनानींच्‍यामुळेच माळवा प्रांतावर मराठी सत्ता टिकली
!!... धार पवारांची राजमुद्रा ...!!
" श्री भवानीशंकर चरणी तत्पर .......!
आनंदरावसुत यशवंतराव पवार निरन्तर..!!!"

महारानी सुगंधा देवी ( 883 - 914)

 


महारानी सुगंधा देवी ( 883 - 914) 10 वीं शताब्दी के दौरान उत्तरी भारतीय उपमहाद्वीप में कश्मीर की शासक थी ।।
कश्मीर के महान (चमार) महाराजा शंकरवर्मन से विवाह करके वह 885 से 902 तक कश्मीर की महारानी थीं। उन्होंने 902 और 904 के बीच अपने पुत्र राजा गोपालवर्मन के अल्पसंख्यक होने के दौरान कश्मीर की रानी रीजेंट के रूप में सेवा की। उन्हें 904 में कश्मीर की रानी श्री सुगंध देव के रूप में अपने अधिकार में सम्राट घोषित किया गया।।

Saturday, 9 December 2023

#शिवदेवी तोमर

 


#शिवदेवी
तोमर
यह बड़ौत की 16 वर्षीय तोमर जाटणी थी।प्रथम गदर में क्रांति की मशाल बिजरौल निवासी बाबा शाहमल सिंह तोमर ने थामी। उन्होंने ब्रितानी हुकूमत की ईंट से ईट बजाकर फिरंगियों के छक्के छुड़ा दिए। 10 मई 1857 को प्रथम जंग-ए-आजादी का बिगुल बजने के बाद बाबा शाहमल सिंह तोमर ने बड़ौत तहसील पर कब्जा करते हुए आजादी के प्रतीक ध्वज को फहराया। यहां से लूटे धन को दिल्ली के अंतिम मुगल बादशाह बहादुर शाह जफर को भिजवाया। \
बड़का गांव में 18 जुलाई 1857 को गोरी सेना से आमने-समाने की लड़ाई में बाबा शाहमल शहीद हो गए। जिस के बाद 1857 की क्रांति को दबाने के लिए अंग्रेजों ने बड़ौत की पट्टी चौधरान स्थित मकानों को ध्वस्त कर चबूतरों में तब्दील कर दिया। लोग बेघर हो गए। इससे जनाक्रोश भड़का। उधर, बाबा शाहमल की शहादत के बाद उनका साथ देने वाले 32 जाट क्रांतिकारियों को अंग्रेजों ने एक साथ बिजरौल गांव के बाहर बरगद के पेड़ पर फांसी दे दी।
इस घटना की चश्मदीद रहीं बड़ौत निवासी जाट परिवार की शिवदेई तोमर का खून खौल उठा। उन्होंने दुश्मन को ललकारा और 17 फिरंगियों को तलवार से मौत के घाट उतार दिया जबकि 25 भागकर छिपने में सफल रहे। घायल शिवदेवी अपने घावों की मरहम पट्टी कर रही थी कि बाहर से आए अंग्रेजों ने उसे घेर लिया। वीर बालिका ने मरते दम तक अंग्रेजों से लोहा लिया।

Wednesday, 6 December 2023

रजिया सुल्तान

 


रजिया सुल्तान
------------------
"रजिया"(1236-40 ई0) भारत में मुस्लिम शासन की प्रथम और संभवतः अंतिम महिला शासक रही जो कि इल्तुतमिश की पुत्री थी। इल्तुतमिश ने दिल्ली सल्तनत में वंशानुगत राजतंत्र को स्थापित करते हुये अपनी बेटी उत्तराधिकारी नियुक्त किया क्योंकि उसकी नजरों में उसके बेटे अयोग्य थे।
दिल्ली सल्तनत तो अभी तुर्की सरदारों और उलेमा वर्ग की नीतियों पर संचालित थी, इसलिए इन दोनों वर्गों ने रजिया के सुल्तान बनने का विरोध किया।
उलेमाओं के अनुसार इस्लाम में महिला को शासक बनने की अनुमति नहीं दी गयी है, दूसरी ओर सशक्त सरदार वर्ग पुरुष-प्रधान व्यवस्था में किसी महिला के सत्ता के अधीन रहना नहीं चाहता था।
लेकिन रजिया के साथ दिल्ली की जनता(केवल शहर की मुस्लिम जनता जो प्रत्यक्ष रूप से सल्तनत से जुड़ी थी) थी जिसने स्वेच्छा और सक्रियता के साथ रजिया को सुल्तान बनाने में मदद की(कुछ अपुष्ट सूत्रों के अनुसार इल्तुतमिश की बेगम शाह तुर्कान के हस्तक्षेप से परेशान होकर कुछ असंतुष्ट सरदारों का भी समर्थन मिला था रजिया को)।
जल्द ही जब तुर्क सरदारों ने यह महसूस किया कि रजिया के शक्तिशाली होने पर 40 तुर्क सरदारों की दल-चालीसा(चिहलगानी) का पतन हो सकता है तो उन्होंने रजिया के खिलाफ षडयंत्र शुरू कर दिए। दूसरी ओर उलेमा वर्ग ने कहा कि रजिया ने पर्दा करना छोड़ दिया है, यह शरीयत के खिलाफ है।
रजिया ने इसके लिए एक नई नीति शुरू की। तुर्क सामन्तो के जगह वह गैर-तुर्क मुस्लिम सरदारों को प्रोत्साहन और पदोन्नति देने लगी,इनमें हबशी अबीसीनियाई(अफ्रीकी) सरदार मालिक याकूत प्रमुख था, जिसे रजिया ने अमीर-ए-अखुर(अस्तबल का प्रधान) का पद दिया। याकूत रजिया का इतना घनिष्ट था कि रजिया को घोड़े पर बैठते समय वह हाथों से सहारा देता था। मध्यकालीन लेखकों में जिनमें फरिश्ता प्रमुख है, इसके अनुसार इनके बीच प्रेम संबंध था(इसी को लेकर के हेमा मालिनी और धर्मेंद्र की रजिया सुल्ताना फ़िल्म बनाई गई है जिसमें धर्मेंद्र को काले रंग में दिखाया गया है)। हालाँकि तत्कालीन इतिहासकार मिनहाज सिराज इस आरोप को सिरे से खारिज करता है।
चूँकि तुर्क सरदार खुद को अन्य मुस्लिम सरदारों से नस्लीय तौर पर उच्च समझते थे इसलिए गैर तुर्क सामंतों के आने के वजह से उनका असंतोष और बढ़ने लगा। रजिया ने दो तुर्क सरदारों मलिक एतगीन और मलिक अल्तूनिया को विशेष स्थान दे रखा था जबकि इन्हीं दो सरदारों ने रजिया को सत्ता से हटाने का मुख्य षड्यंत्र रचा, जिन्हें रजिया के वजीर का भी समर्थन प्राप्त हो गया था। षडयंत्रों और विद्रोह को दबाने के किये जब रजिया राजधानी से दूर गयी तो दिल्ली सिंहासन पर तुर्क सरदारों ने रजिया के सौतेले भाई बहराम शाह को बिठा दिया।
अल्तुनिया को सरदारों ने नायब ममालिकत का पद न दिया तो वह विद्रोही सरदारों से अलग हो गया जिसका फायदा रजिया ने उठाया और उससे संपर्क स्थापित कर उससे विवाह कर लिया। रजिया ने अल्तुनिया के साथ मिलकर दिल्ली पर आक्रमण कर दिया। रजिया युद्ध में पराजित हो गयी और भटिंडा आते समय रास्ते में कैथल के पास उसकी हत्या कर दी गयी।
रजिया का शासन केवल साढ़े तीन साल का रहा लेकिन यह मध्यकालीन भारत के लिए बहुत महत्वपूर्ण है। प्रथम कि वह भारत की पहली महिला मुस्लिम शासिका थी। द्वितीय कि उसे जनता के समर्थन पर सत्ता मिली। तृतीय कि रजिया ने पहली बार तुर्क इक्तादारों की शक्ति को तोड़कर गैर-तुर्क सरदारों को शासन में उच्च पदों पर सम्मिलित किया, इस मामले में वह अलाउद्दीन खिलजी और मुहम्मद बिन तुगलक की अग्रगामी थी। रजिया एक बुद्धिमान शासिका थी जिसने ख़्वारिज्म के शासक को मंगोलों द्वारा निष्काषित होने पर शरण तो दिया पर मंगोलों के विरुद्ध कोई सैनिक सहायता करने से इनकार कर दिया, इल्तुतमिश ने भी अपने शासन के दौरान ऐसा ही किया था।
रजिया के अंदर राजनैतिक दूरदर्शिता और योग्यता का अभाव नहीं था फिर भी रजिया सफल न हुयी तो इसके पीछे शक्तिशाली तुर्क सरदारों और उलेमा वर्ग का विरोध था। तुर्क सरदारों के पास जहाँ प्रशासन और सैनिक शक्ति मौजूद थी तो वहीं उलेमा वर्ग अपने उच्च धार्मिक स्थान के कारण आम जनों के मत/विचार को नियंत्रित और प्रभावित कर सकता था।
तत्कालीन लेखकों ने रजिया सुल्तान के असफलता के लिए केवल एक कारण गिनाए हैं कि वह महिला थी इसलिए असफल हो गयी। तत्कालीन इतिहासकार मिनहाज सिराज लिखता है कि रजिया के अंदर एक महान, संप्रभु और सुल्तान के लिए आवश्यक सभी गुण और योग्यताएं मौजूद थीं। सुल्तान बनने पर उसने महिलाओं के वस्त्र त्याग दिये, चोगा(काबा) और टोपी(कुलाह) पहनने लगी। वह हाथी की सवारी करती थी। मर्दों के लिए वह इसलिए अयोग्य थी क्योंकि वह एक औरत थी।
आधुनिक इतिहासकार के. ए. निजामी लिखते हैं कि इस बात से इनकार नहीं किया जा सकता है कि इल्तुतमिश के उत्तराधिकारियों में वह सबसे श्रेष्ठ थी।
रजिया अपने सिक्कों पर उमदत-उल-निस्वां की उपाधि के नाम से जानी जाती थी। फिर भी रजिया के कब्र का निश्चित पता आजतक नहीं हो पाया है, 3 जगहों पर उसके असल कब्र होने के दावे किए जाते हैं। ऐसा इसलिए क्योंकि वो एक पुरुष शासक न थी।
(Copied)
Pic:- दिल्ली के तुर्कमान गेट के पास रजिया का उपेक्षित कब्र।

हिराबाई पेडणेकर:

  हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली "पुरुषानेही स्त्रीवर...