#
फुरसुंगीची_फिरंगाई
फुरसुंगीची_फिरंगाई
जीवबा बक्षी करकरे हे महादजी शिंदेंचे सैन्याने होते त्यांचे चुलत बंधू जोगोबा (बाप्पु) करकरेहोय या दोन्ही बंधूंचे आडनाव करकरे असून सदर घराणे हे कोकणातलं आहे दौलतराव शिंदे यांच्या काळात उत्तरतील आजच्या वृंदावन यास मोमीनाबाद असे म्हणतात त्याचे जोगोबा करकरे हे शिंदेच्या टकासंळचे प्रमुख होते दौलतराव शिंदे सोबत ते पुण्यात आले असता फुरसुंगी येथील फिरंगाई देवीच्या दर्शनास गेले याची नोंद खालील प्रमाणे आहे आणि सदर सदर फिरंगाई देवीचा इतिहास ही सोबत दिलेला आहे तो पुढील प्रमाणे
पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यात कुरकुंभ गावी असलेले फिरंगाई देवीचं शिवकालीन मंदिर सर्वांना माहीत आहे.पुणे शहराजवळ फुरसुंगी आणि लोणी काळभोर गावाच्या शिवला सुद्धा एक शिवकालीन फिरंगाई देवीचं मंदिर आहे.सहसा कोणाला इतिहास माहीत नसल्याने ते दुर्लक्षित असलं तरी त्याची देररेख चांगल्या प्रकारे केली जाते.त्या मंदिराचा इतिहास असा की,
गंगाजी हरपळे (पवार) पाटील म्हणून आई फिरंगाई देवीचा मोठा भक्त होता.कुरकुंभ च्या फिरंगाईची मनोभावे पूजा तो करायचा.दरवर्षी मोठ्या उत्साहात देवीच्या यात्रेला जायचा.अचानक एके रात्री त्याला देवीने दृष्टांत दिला.देवी स्वतः गंगाजी ला भेटायला त्याच्या शेतात तांदळा रूपाने आली. शेतात ओढ्याच्या कडेला देवीचा पंचरंगी तांदळा त्याला दृष्टांत मध्ये दिसला.सकाळी उठून तो त्या ठिकाणी गेला तर पाहिलेला दृष्टांत खरा होता.त्याने तो देवीचा तांदळा उचलून त्याची पूजा करू लागला.त्याला शेंदूर लावून तो त्या ठिकाणी देवीची मनोभावे पूजा करू लागला.
चार पाच वर्षे चांगली आनंदात गेली.नेमक त्याच शेत आणि ज्या ठिकाणी देवीची पूजा करायचा ती जागा लोणी आणि फुरसुंगी च्या शिवेवर होती.लोणी ची काही मंडळी गंगोजी ला पूजाअर्चा साठी कटकट करू लागले.वाद वाढत गेले आणि गंगोजी ने आपल्या देविचा तांदळा उचलून फुरसुंगी च्या शिवेवर असलेल्या स्वतःच्या शेतात स्थापण केला.ओढ्याच्या पलीकडची देवी आता ओढ्याच्या अलीकडे आली.
कुरकुंभची देवीचं इकडं आल्याने कुरकुंभ ला करायचा तशी यात्रा फुरसुंगी मध्ये होऊ लागली.गंगोजी ने मंदिर बांधले शेजारी स्वतःच घर बांधले आणि तिथंच राहू लागला.गंगोजी स्वतः देवीची भक्तिभावाने पूजा करत होता त्यामुळे मंदिरात कोणी गुरव न्हवता.गुरव नसल्याने देवीला अर्पण केलेल्या जिनसा तो स्वतः ग्यायचा.पुढं अशेंच दिवस जात राहिले.यात्रा चांगली भरू लागली.अनेक रोग आले,संकट आली पण देवीच्या आशीर्वादाने सगळं ठीक झालं.चांगली चार पाचशे लोक यात्रेला येऊ लागले.पुढं ओढ्याला चांगलं पाणी लागलं,चांगलं एक देवस्थान तिथं निर्माण झालं.
(संदर्भ- मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड 6 वा.लेखक रचनाकार- इतिहासकार वि.वा.राजवाडे
तेव्हापासुन आज पर्यंत हरपळे पवार कुटुंबीय त्या मंदिराची देखरेख पुजा करतात वपाहतात.
अतिशय सुंदर असलेले हे मंदिर आता दगडी बांधकामात बांधलेल आहे.सध्या लोणी काळभोर टोलनाक्याजवल सायकरवस्ती परिसरात हे मंदिर आहे.
संभाजीराव पवार व वसंतराव पवार फुरसुंगी कर सदर देवस्थान समस्त पवार मंडळी पहातात यावेळी आमचे मित्र सतीश तांबे सर सह सदर दोन्ही मंदिरात दर्शन घेऊन माहिती संकलित केला
अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष)
फोटो साभार- आजरोजी सदर फिरंगाई मंदिरात भेट देऊन काढले आहेत
१) सोबत मुळ फिरंगाई देवीचे ठाणे स्वप्नात दिसले तो गंगाजी हरपले पवार यास सापडले तो जुन्या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊन फोटो काढले आहेत








No comments:
Post a Comment